ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकीय

ठाकुर कंपनीशी सलगी नडली राणेंना भाजप कार्यकर्त्यांचा दणका


विरार/ सध्या जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या दैन्यावर असलेले केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना विरार च्या हितेंद्र ठाकूर यांच्या कार्यालयास भेट देणे चांगलेच महागात पडले .कारण त्यामुळे भाजप कार्यकर्ते प्रंचड नाराज झाले असून त्यांनी या भेटीच्या वेळी हितेंद्र ठाकूर यांच्या विरोधात ..नही चलेगी नहीं चलेगी तनाशही नाही ,,, अशा घोषणा देऊन हितेंद्र ठाकूर यांना भेटायला गेलेल्या नारायण राणे यांची चांगलीच गोची केली .सध्या हितेंद्र ठाकूर आणि त्यांच्या बहुजन विकास आघाडीचे तिन्ही आमदार सत्ताधारी महा विकास आघाडी सोबत असून ठाकूर कंपनीच्या वसई विरार मधील एकाधिकार शाहीला भाजपचा कडवा विरोध आहे . या भागातील सर्व भाजप नेते आणि कार्यकर्ते ठाकूर कंपनीच्या विरोधात आहेत अशावेळी नारायण राणे यांनी हितेंद्र ठाकूर यांच्या कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेणे भाजप कार्यकर्त्यांनी आवडले नाही म्हणून त्यांनी चिडून घोषणा दिल्या .

error: Content is protected !!