ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकीय

मुख्यमंत्र्यांचे कान फुंकून गोविंदांच्या उत्सवावर टास्क फोर्सने फिरवले पाणी- दहीहंडी उत्सव रद्द


मुंबई/ कोरोंनाच्या तिसऱ्या लाटेची सतत भीती दाखवून महाराष्ट्रातील साडेबारा कोटी जनतेची कोंडी करणाऱ्या डॉक्टरांच्या टास्क फोर्सने पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांचे कान फुंकून दही हंडी उत्सव सुधा रद्द करायला लावलाय. त्यामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली असून भाजपा आणि मनसेने मात्र सरकारचा विरोध झुगारून दहीहंडी उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतलाय.
काल मुख्यमंत्र्यांनी दहीहंडी बाबत गोविंदा पथकांच्या समन्वय समितीची बैठक घेतली होती मात्र या बैठकीला केवळ सत्ताधारी पक्षाशी संबंधित असलेल्या दहीहंडी आयोजकांना च आमंत्रित करण्यात आले होते असा आरोप भाजपने केला आहे. या बैठकीत तिसऱ्या लाटेचे तुणतुणे वाजवून गोवंदा समन्वय समितीने भीती दाखवण्यात आली .यंदा दहीहंडी साजरी करू नका असे सांगण्यात आले.त्यामुळे यंदा दहीहंडी साजरी होणार नाही.सरकारचा हा निर्णय कळताच गोविंदा पथके आणि दहीहंडीच्या आयोजकांमधे संतापाची लाट उसळली.युवासेनेचे जे मेळावे होतात त्याला होणाऱ्या गर्दीतून कोरोंना पसरत नाही का? मुख्यमंत्री आणि मंत्र्यांच्या दौर्‍याच्या वेळेला होणाऱ्या गर्दीतून कोरोंना पसरत नाही का ? असा सवाल भाजप आणि मनसेने केला आहे तसेच सरकारने कितीही विरोध केला तरी आम्ही दहीहंडी उत्सव साजरा करणारच असा निर्धार या दोन्ही पक्षांनी व्यक्त केला असून भाजप आमदार राम कदम यांनी तर पत्रकार परिषद घेऊन सरकारचा निर्णय धुडकावून लावला. त्यामुळे दहीहंडी वरून आता राजकीय राडेबाजी सुरू होणार आहे दरम्यान सरकारला वेळोवेळी चुकीचे सल्ले देणाऱ्या टास्क फोर्स च्या डोकतेररावरती या दोन्ही पक्षांनी टीका केली आहे.
मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितले आम्हाला बैठकीत बोलू दिले नाही .आमचा आवाज दाबण्याचा आला तर या बैठकीनंतर समन्वय समितीने जाहीर केले की दहीहंडी रद्द करण्याचा सरकारने जरी निर्णय घेतलेला असला तरी आम्ही याबाबतीत कुणावरही दबाव टाकणार नाही. ज्यांना दहीहंडी आयोजित करायची असेल त्यांनी करावी ज्यांना सरकारचे निर्णय मान्य असतील त्यांनी करू नये
.


बॉक्स/सण आणि उत्सव यापेक्षा लोकांचा जीव अधिक महत्वाचा /मुख्यमंत्री
कोरोनाचे संकट अजून संपलेले नाही .तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे अशा परिस्थितीत सण साजरे करताना सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे सरकार त्याच दृष्टीने प्रयत्न करीत आहे कारण सण आणि उत्सव यांच्यापेक्षा लोकांचा जीव महत्वाचं आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले
.

error: Content is protected !!