ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

भावकीची निवडणूक करणाऱ्यांना बघतोच – अजित पवारांचा दादा – वाहिनीला इशारा

पुणे : बारामतीत मला एकटं पाडलं जातंय असं सुरूवातीला भावनिक आवाहन करणाऱ्या अजित पवारांनी , आता विरोधकांना थेट दमच दिला आहे. शिरूर मधून आढळराव पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा करताना त्यांनी ही निवडणूक गावकीची आणि भावकीची नाही, माझ्या बाबतीत काहींनी भावकीची निवडणूक केली आहे, मी बघतो त्याचं काय करायचं असं ते म्हणाले. अजित पवारांनी कुणाचं नाव जरी घेतलं नसलं तरी त्यांचा रोख हा काका शरद पवार, सख्खे भाऊ श्रीनिवास पवार आणि वहिणी शर्मिला पवारांकडे होता अशी चर्चा सुरू आहे.
खासदारकीला एक, आमदारकीला एक यापुढं असं अजिबात चालणार नाही. दोन्ही ठिकाणी घड्याळ चालवायचं आहे. प्रत्येकानं आपापला गाव बघा. आधी तर भावकी सोबत आहे का हे पण बघा. अरे बाबा मला भावकीच माहितेय भावकीची निवडणूक करणाऱ्यांना नंतर बघतोच अशा शब्दात अजित पवारांनी आपले बंधू श्रीनिवास व वाहिनी शर्मिलाला इशारा दिला आहे.

error: Content is protected !!