ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

महायुतीचा जागा वाटपाचा तिढा सुटला

मुंबई – महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा जवळपास सुटला असल्याची माहिती आहे. महायुतीच्या ४८ पैकी ४६ निश्चित झालेत तर 2 जागांवरुन अजूनही तिढा कायम असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महायुतीमध्ये नाशिक आणि ठाण्याच्या जागेवरुन अजूनही रस्सीखेच सुरु आहे. ठाण्याच्या जागेसाठी भारतीय जनता पक्ष आग्रही आहे. कारण ठाण्यामध्ये भाजपची मोठी ताकद आहे. तर ठाण्याची जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रतिष्ठेची असल्याने सेना ही जागा सोडण्यास तयार नाही. ठाणे आणि नाशिक सोडून संभाव्य जागावाटप महायतीचे जागावाटप कसे असेल याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसाठी जागा
कल्याण
दक्षिण मुंबई
दक्षिण मध्य मुंबई
उत्तर पश्चिम मुंबई
पालघर
मावळ
रामटेक
कोल्हापूर
हातकणंगले
बुलडाणा
शिर्डी
हिंगोली
यवतमाळ वाशिम

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या जागा
बारामती
शिरूर
रायगड
परभणी (महादेव जानकर)

error: Content is protected !!