ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी पर्यटकांची चौपाट्यांवर तुफान गर्दी


मुंबई – वर्षाचा शेवटचा दिवस असल्याने शेवटचा सूर्यास्त पाहण्यासाठी आणि मावळणाऱ्या सूर्याला निरोप देण्यासाठी शेकडो लोक चौपाट्यांवर जमले होते. मुंबईच नव्हे देशभरात हेच चित्र होतं. शेकडो लोक कुटुंबकबिल्यासह समुद्रावर जमले. मावळणारा सूर्य सर्वांनी डोळेभरून पाहिला
मुंबईकर २०२३ या सरत्या वर्षाला आज आपण निरोप देत आहेत आणि नव्या आशेनं २०२४ मध्ये पाऊल टाकणार आहेत. सरत्या वर्षाला निरोप देताना शेवटच्या सूर्यास्त पाहण्यासाठी अनेक जण आज समुद्र किनारी जमले होते. मुंबईत आज संध्याकाळी ६ वाजून १२ मिनिटांनी सूर्यास्त झाला. हा वर्षाचा शेवटचा सूर्यास्त
२०२३ ला अलविदा आणि २०२४ चे वेलकम करण्यासाठी मुंबईच्या जुहू बीचवर पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे. थर्टी फर्स्ट साजरी करण्यासाठी मुंबईसह देशातील विविध राज्यातील लोक मुंबईत दाखल झाले आहेत. लाखो लोक जुहू बीचवर पोहोचले आहेत. पर्यटकांची प्रचंड गर्दी इथे पाहायला मिळत आहे. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ठिकठिकाणी पोलीस तैनात आहेत, रस्त्यांवर पोलीस बंदोबस्त आहे.
नागुपरातही आज नागरिकांचा जल्लोष पाहायला मिळाला. नवीन वर्ष सुरु व्हायला अवघे काही तास शिल्लक राहिले असून नागपूरकरांमध्ये नव वर्षाच्या स्वागताचा प्रचंड उत्साह संचारला आहे. सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्नं, नव्या आशा, नवी उमेद आणि नाविन्याची कास धरण्यासाठी नागपूरकर उत्सुक झाला आहे. नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी बच्चे कंपनीने नागपूरच्या फुटाळा तलावावर प्रचंड गर्दी केली आहे. या बच्चे कंपनीच्या हाती नववर्षाच्या स्वागताचे फलक होते. त्यांच्या चेहऱ्यावरील उत्साह ओसंडून वाहत होता.
दापोलीतही पर्यटकांची मोठी गर्दी जमली आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी काही तास शिल्लक आहेत. नव वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची मुरुड किनाऱ्यावर प्रचंड गर्दी वाढली. नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांचा उत्साह वाढला आहे. कोकणातील सर्वच समुद्र किनारे पर्यटकांनी गजबजले आहेत. जुन्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी लोक चौपाट्यांवर आले आहेत. गोवाही आता सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी तयार झालेला आहे. गोव्यातील सर्व बीच हाउसफुल्ल झाले आहेत. कलिंगूड, वाघा बीचवर पर्यटकांची तुफान गर्दी झाली आहे.

error: Content is protected !!