ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

ठाण्यातील रेव्ह पार्टीवर पोलिसांची धाड५ तास नंगानाच करणाऱ्या १०० जणांना अटक

ठाणे – ठाण्यातील कासारवडवलीत नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आयोजित करण्यात आलेल्या रेव्ह पार्टीवर पोलिसांनी धाड टाकली आहे. या रेव्ह पार्टीत सामील झालेल्या १०० हून अधिक तरुण-तरुणीला पोलिसांना अटक केली आहे. या सर्वांकडे ड्रग्स, गांजा आणि इतर गोष्टी सापडल्या आहेत. ही सर्व मुलं चांगल्या घरातील असल्याचं सांगितलं जात आहे. कासावरडीतील खाडी परिसरातील जंगलात भयाण अंधारात या तरुण-तरुणींचा पाच तास नंगानाच सुरू होता. टिप मिळताच पोलिसांनी प्लानिंग करून छापा टाकला आणि या सर्वांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
ठाण्यातील सेंडोबा मंदिराजवळील कासारवडवलीच्या खाडी लगतच्या जंगलात ही पार्टी आयोजित करण्यात आली होती. गणेश राऊत नावाच्या इसमाने या पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीत १०० हून अधिक तरुण-तरुणी सामील झाले होते. हे सर्वजण कार आणि बाईकने आले होते. या खाडीत अनधिकृतपणे भराव टाकून जागा तयार केली होती. त्या ठिकाणीच पार्टीची व्यवस्था केली होती. अमलीपदार्थ देण्यासाठी टेबल टाकण्यात आले होते. मटण, मच्छी, चिकनचीही व्यवस्था करण्यात आली होती. दारू, बियरचीही व्यवस्था होती. तसेच डीजेही लावण्यात आला होता.
नशा करण्यासाठीच्या बॉटल्स, सिगारेटचे पॉकेट्स, बियरच्या बॉटल, ड्रग्स, एलएसडी, गांजा, चरस, दारू आदी अमलीपदार्थ या रेव्ह पार्टीत ठेवण्यात आले होते. डीजेच्या तालावर नशेबाज तरुण थिरकत होते. रात्री १० वाजता ही रेव्ह पार्टी सुरू झाली. पहाटे 3 वाजेपर्यंत ही पार्टी सुरू होती. या पार्टीची कुणकुण लागल्यानंतर ठाणे पोलीस सतर्क झाले. पोलिसांनी तात्काळ प्लानिंग तयार केला. व्हॅन घेतली. अधिक कुमक मागवली आणि कासारवडवलीच्या जंगलात धाड मारली आणि हायसोसायटीतल्या गर्दुल्ल्याना अटक केली

error: Content is protected !!