ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

भुजबळ यांनी महाराष्ट्रात फिरून आग लावली – शिंदे गटाच्या आमदाराचा आरोप

मुंबई, — मनोज जरांगे यांच्याकडून आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिली जाते असे म्हणत असताना भुजबळ म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्या जरांगेचा उल्लेख केला, अहो ते सतत धमक्या देत आहेत. याला टपकवीन, त्याला टपकवीन. मला स्वत:ला धमकी दिली, अशी तक्रार भुजबळांनी केली. यावर शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड म्हणाले, मंत्री छगन भुजबळ यांना बोलण्याचा काहीच अधिकार नाही. आधी महाराष्ट्र फिरून छगन भुजबळ यांनी आग लावली आता मनोज जरांगे पाटील यांच्यावर आरोप करताय की त्यांच्यापासून जीवाला धोका आहे. आधी दोन समाजात फूट पाडली आणि दोन्ही समाजात आग लावण्याचा का प्रयत्न केला? असा सवाल करत संजय गायकवाड यांनी छगन भुजबळ यांच्यावर हल्लाबोल केला तर सरकारने दिलेल्या आरक्षणाचं स्वागत करत गायकवाड म्हणाले, गेल्या ४५ वर्षांपासून मराठा समाजातील मागासलेला समाज आरक्षणाची मागणी करत होता आणि मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवरायांची शपथ घेतली होती की, मराठ्यांना आरक्षण मिळवून देणार…त्याप्रमाणे इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता त्यांनी मराठा समाजाला १० टक्के स्वतंत्र आरक्षण दिलं आहे

error: Content is protected !!