ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामुंबईराजकीय

दिशा सांलियन प्रकरणी मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल राणे पिता पुत्र अडचणीत-चंद्रकांतदादा सुधा रडारवर


मुंबई-शिवसेना विरुद्ध भाजप यांच्यातील संघर्ष आता निर्णायक वळणावर पोचला आहे कारण दिशा सालीयान प्रकरणात दिशाचे कुटुंबीय आणि महिला आयोगाच्या तक्रारीवरून केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे आमदार पुत्र नितेश राणे यांच्या विरोधात मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .त्यामुळे राणे पिता पुत्रंच्या अडचणी वाढल्या आहेत
सुशांत सिंग राजपूत यांची कथित सेक्रेटरी असलेल्या दिशेने 8 जून २०२० मध्ये इमारतीवरून खाली उडी टाकून आत्महत्या केली होती आणि या प्रकरणात राणे पिता पुत्रांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे नाव घेतले होते .तसेच राणेंनी १९ फेब्रुवारीला पत्रकार परिषद घेऊन दिशा हिने आत्महत्या केली नव्हती तर तिची हत्या करण्यात आली होती तसेच तिच्यावर बलात्कार झाला होता. पुरावे नष्ट करण्यात आले होते आणि यावेळी एका मंत्र्यांची गाडी इमारतीजवळ उभी होती असा आरोप केला होता दरम्यान राणे यांच्या आरोपांमुळे दिशाचे आई वडील प्रचड दुखी झाले होते आणि त्यांनी राणेंचे सर्व आरोप फेटाळून दिशा आता या जगात नसल्याने तिची बदनामी बंद करा तिच्यावर बलात्कार झाला नव्हता किंवा तिची हत्या सुधा झाली नव्हती असे सांगितले त्यानंतर महापौर किशोरी पेडणेकर आणि महिला आयोगाच्या दोन सदस्यांनी दिशा हिच्या घरी जाऊन तिच्या पालकांचे संत्वन केले होते याच दरम्यान महिला आयोगाकडे राणे पितापुत्र यांच्या विरुद्ध तक्रार करण्यात असली होती . त्यावर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चकांकर यांनी पोलिसांना 48 तासात अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते दरम्यान दिशाच्या पालकांनीही पोलीस ठाण्यात तक्रार केली होती त्यामुळे काल नारायण राणे आणि त्यांचे पुत्र नितेश राणे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आता या गुन्ह्यात राणे पिता पुत्र यांची चौकशी होणार आहे
चंद्रकांतदादा सुधा रडारवर
दिशा सालियन हिच्या बाबतीत राणे यांनी केलेल्या वक्तव्याचा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी समर्थन केले होते त्यामुळे आता ते सुधा महिला आयोगाच्या रडारवर असून त्यांच्यावरही कारवाईचे संकेत महिला आयोगाने दिले आहेत.

error: Content is protected !!