ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

मीरा रोड पाठोपाठ मुंबईच्या महमद अली रोडवरची अतिक्रमणे हटवली


मुंबई/ मिरा रोड मधे हिंदूंच्या मिरवणुकीवर दगडफेकीचे प्रकार घडल्यानंतर यात सामील असलेल्या समाज कांटकांच्या बेकायदेशीर अतिक्रमणावर पालिकेने कारवाई केली होती.त्यानंतर आता मुंबईतील महमद अली मार्गावरील बेकायदेशीर अतिक्रमणावर पालिकेने कारवाई सुरू केली असून तब्बल 40 अतिक्रमणे हटविण्यात आली त्यामुळे या भागात तणावाचे वातावरण आहे. ही कारवाई सूडबुद्धीने करण्यात आल्याचे अतिक्रमण करणाऱ्यांचा आरोप आहे .तर या अनधिकृत स्टॉल बाबत नागरिकांच्या अनेक तक्रारी होत्या या अतिक्रमणाचा वाहतुकीला सुधा अडथळा निर्माण होत होता म्हणून ही कारवाई करण्यात आली असे पालिकेचे म्हणणे आहे.
     महमद अली रोडवर जेजे हॉस्पिटल पासून क्रोफिड मार्केट पर्यंतच्या सर्व फुटपाथ एका विशिष्ट लोकांनी लाटल्या आहेत व त्यावर बेकायदेशीर स्टॉल बांधले आहेत. गोल देऊळ परिसरात तर रस्त्यावर स्टॉल आहेत मात्र पालिकेच्या अतिक्रमण विभागातील अधिकाऱ्यांचे या फेरीवाल्यांशी आर्थिक लागेबांधे असल्याने कारवाई होत नव्हती पण आता सरळ वरून सूत्रे हलली असल्याने पालिका अधिकाऱ्यांना कारवाई करणे भाग पडले

प्रशासनाने सफाई मोहीम राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या असून त्याअंतर्गत महापालिकेच्या सर्व प्रभागात ही मोहीम राबविण्यात येत आहे. फूटपाथ स्वच्छ करण्यासाठी महानगरपालिका रस्त्याच्या कडेला असलेले विक्रेते हटवत आहेत. गेल्या वर्षी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून ही मोहीम सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. “जिथे कारवाई करण्यात आली आहे, हे स्टॉल तात्पुरते होते आणि ते कायदेशीर नाहीत. त्यामुळे आम्ही त्यांना कोणतीही नोटीस बजावली नाही आणि बुधवारी थेट कारवाई करण्यात आली आहे,” असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं.

error: Content is protected !!