ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकीय

तिसरे महायुद्ध अटळ


साम्राज्य विस्ताराच्या द्यासाने पछाडलेल्या महासत्ता जगाला शांततेने जगायला देणार नाहीत असे आता वाटायला लागले आहे कारण एकीकडे रशियाने युक्रेंशी युद्ध छेडले आहे तर दुसरीकडे चीन तैवांचा घास घ्यायला तापला आहे.अशा स्थितीत अमेरिका दोन्ही प्रकरणात छोट्या राष्ट्रांच्या बाजूने उभी आहे कदाचित त्यामुळेच चीन तैवान वर हल्ला करायला घाबरत आहे पण रशियाने मात्र जगाच्या विरोधाची पर्वा न करता युक्रेनच्या दोन प्र्याना स्वतंत्र देश म्हणून घोषित करून .थेट युक्रेंवर लष्करी कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे अमेरिकेसह सर्व युरोपियन देश रशियाच्या विरोधात एकवटनार आहेत आणि त्यामुळे जगात तिसऱ्या महायुद्धाचा भडका उडण्याची शक्यता आहे .कोरोनाने गेल्या दीड वर्षात संपूर्ण जगाचं आर्थिक कंबरडे मोडून टाकले आहे अशा स्थितीत युद्ध कुणालाच नकोय. छोटे देश तसेच भारतासारख्या विकसनशील देश जगात सतत शांतीची कबुतरे उडवत आहेत तर दुसरीकडे रशिया चीन आणि अमेरिकेसारख्या महासत्ता या शांतीच्या कबुतरांची गोळ्या घालून शिकार करीत आहेत त्यामुळेच जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहे .आश्चर्याची गोष्ट अशी की रशिया नातो किँवा सुरक्षा परिषदेचे निर्णय मानायला तयार नाही अशा स्थितीत सर्वांनी एकत्र येऊन रशियाची मुजोरी मोडून कडणे हा एकमेव उपाय आहे तसे आले तर दुसऱ्या महायुध्दात जी हलत हिटलरची झाली तीच हलत पुतींची होऊ शकते.तसे पाहता युक्रेन हा रशियाचाच एक भाग होता पण रशियाच्या विभाजन झाल्यावर युक्रेन वेगळा झाला आणि पाश्चिमात्य देशांशी उक्रेंची सलगी वाडली आणि हेच रशियाच्या पोटदुखीचा मुल कारण आहे.साम्राज्यवादी देशांनी त्यांच्या ताब्यातील छोट्या देशांना जरी स्वातंत्र्य दिले तरी त्यांनी स्वातंत्र्यानंतरही आपले गुलाम बनून राहावे अशी रशिया सारख्या महा सत्तांची अपेक्षा असते .पण तसे होत नाही .स्वातंत्र्य म्हणजे गुलामीतून मुक्तता! मग स्वातंत्र्य झालेल्या देशांनी महासातांची गुलामी का पत्करावी ? पण चीन रशिया अमेरिका यांच्यासारख्या साम्राज्यवादी महासाताना हे मान्य नाही अर्ध्या जगावर आपली हुकूमत असावी हे एकच धोरण नजरेसमोर ठेऊन चालणाऱ्या या महासत्ता जगात शांततेने जगू पणानाऱ्या प्रत्येक माणसाच्या समोर एक महासंकट बनून उभ्या राहत आहेत.आणि याच भीतीतून इस्लामी दहशतवादाचा जन्म झाला .जर रशिया अमेरिकेसारख्या महासत्ता वाढल्या तर त्या इस्लामला दाबून टाकतील नेस्तनाबूत करून टाकतील या भीतीपोटी जगातले सर्व इस्लामी दहशतवादी संघटना अमेरिकेच्या विरोधात आहेत रशियाला जरी त्यांचा थेट विरोध नसला तरी रशिया बरोबर त्यांचे तितकेसे चांगले संबंध नाही या सर्व पार्श्वभूमीवर जी महासतांची दडपशाही सुरू आहे टी जगात अशांतता मजवणारी आहे.त्यामुळे या महासत्ता बाबत जगणे काहीतरी निर्णय घ्यायलाच हवा .कारण रशिया चे एकयला तयार नाही सुरक्षा परिषदेच्या ठरवला केराची टोपली दाखवतोय आणि संपूर्ण युरोपचा रोष पत्करून युकरेंवर हल्ला करतोय ही तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात आहे
जर तिसरे महायुद्ध झाले तर त्यात अर्थातच अण्वस्त्रे आणि जैविक अस्त्रांचा वापर केला जाईल आणि तो जगाच्या अस्तित्वासाठी घटक ठरेल दुसऱ्या महायुध्दात अमेरिकेने जपानवर दोन अणुबॉम्ब टाकले त्याचे भयानक परिणाम आज 80 वर्षानंतरही जपानी लोक भोगत आहेत आणि आता तर परिस्थिती बदलली आहे.रशिया अमेरिकेकडे 5 हजार किमी पर्यंत मारा करणारी भयानक क्षेपणास्त्रे आहेत अशावेळी युद्धाची तीव्रता किती भयंकर असू शकेल याची कल्पनाही करता येत नाही रशियाने युरोपचा रोष पत्करून यक्रेंवर हल्ला केलाय अशा वेळी अमेरिका आणि इंग्लंड,फ्रान्स जर्मनी सारखे देश युक्रेनच्या बाजूने उभे राहणार तर रशियाला चीनची मदत आहे त्यामुळे हे महायुद्ध रशिया विरुद्ध युक्रेन असे न राहता युरोप विरुद्ध आशिया अशा दोन खंडांमध्ये लढले जाईल त्यामुळे यात भारत अथवा आशिया खंडातील इतर देश असोत अथवा नसोत युरोपियन राष्ट्रांच्या माऱ्याच्या टप्प्यात आशिया खंडातले बहुतेक देश येतील आणि त्यांचेही मोठे नुकसान होईल उदाहरणार्थ चीनवर अमेरिका किंवा युरोपियन राष्ट्रांनी जैविक अस्त्रांचा किना अण्वस्त्रांचा मारा केला तर चीनच्या शेजारी असलेल्या भारताला किंवा नेपाळ अथवा पाकिस्तानलाही या हल्ल्याचे नुकसान सोसावे लागणार आणि मग इच्छा नसतानाही या महायुध्दात त्यांना भाग घ्यावा लागणार आणि महायुध्दात अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते त्यामुळेच महायुद्ध टाळायला हवे.पण आजची परिस्थिती पाहता तसे होताना दिसत नाही त्यामुळे जगासमोर पुढे काय वाढून ठेवले आहे आणि त्याचे परिणाम पुढे काय होणार आहेत याच्या कल्पनाही अंगावर काटा येतोय

error: Content is protected !!