ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

माझा महाराष्ट्र! लबाड राजकारण्यांचा महाराष्ट्र!

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सारखा जनकल्याणासाठी आयुष्यभर लढणारा जाणता राजा आणि शाहू फुले आंबेडकर यांच्या सारख्या महान समाज सुधारकांचां महाराष्ट्र आज राजकारणी लोकांमुळे इतका बदनाम झाला आहे की महाराष्ट्रातील लोकांना मान वर करून मी महाराष्ट्रीयन आहे असे सांगायला लाज वाटू लागलीय.इतकी गेल्या दोन वर्षात महाराष्ट्राची बदनामी सुरू आहे.आणि ही बदनामी भाजपच्या लोकांनी सुरू केली आहे.महाराष्ट्रात राहून ,महाराष्ट्राचं अन्न खाऊन महाराष्ट्रातल्या सतेची ऊब घेऊन महाराष्ट्राच्या राजकारणात अफाट पैसा कमवून उलट महाराष्ट्राची च बदनामी करणाऱ्या या लोकांना झालंय तरी काय तेच कळत नाही.सत्ता गेल्यावर माणूस अस्वस्थ होतो हे समजू शकत पण सत्ता गेल्यावर माणूस दुसऱ्यावर दगडी मारण्या इतका वेडा होतो हे महाराष्ट्र प्रथमच बघतोय.त्यामुळे आता लोकांना राजकारण आणि राजकारणी लोकांबद्दल घृणा वाटायला लागलीय.जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी निवडून गेलेले हे लोक जेंव्हा मीडियाच्या कॅमेऱ्यासमोर एकमेकांचे कपडे फडायला लागलेत तेंव्हा कुठली झक मारली आणि या अशा लोकांना निवडून दिले असे आता वाटायला लागले आहे.यांच्या पेक्षा ब्रिटिश चांगले होते असे आता वाटायला लागले आहे.इतकी वाईट परिस्थिती या लोकांनी निर्माण करून ठेवली आहे.महाराष्ट्राच्या राजकारणाचा अक्षरशः उकिरडा करून टाकलाय. त्यामुळे कधी काळी महाराष्ट्राकडे आदराने बघणारे देशवासी आज मात्र महाराष्ट्राकडे तुच्छतेने बघत आहेत.इतकी महाराष्ट्राची बदनामी झालीय .कंगना सारखी एक फालतू बाई मुंबईची तुलना पाकिस्तानशी करते आणि भाजपचे लोक टाळ्या वाजवतात.यासारखे दुर्दैव नाही.सताधरी आणि विरोधक यांच्यात राजकीय मतभेद असू शकतात.पण ते मुद्द्यांवर असायला हवेत. आणि ते मुद्देही राज्याच्या विविध प्रशासनाशी निगडित असायला हवेत.पण राज्याचे प्रश्न बाजूला ठेऊन जनतेचे प्रश्न बाजूला ठेऊन जेंव्हा तू किती खाल्लेस आणि मी किती खाल्ले यांच्यावर सत्ताधारी आणि विरोधक जेंव्हा नवरा बायको प्रमाणे भांडायला लागतात तेंव्हा मात्र लोकांचा संताप अनावर होतो.कारण हे सगळ एकतर्फी सुरू आहे.महाविकास आघाडीमध्ये सगळे भ्रष्टाचारी आहेत भाजप मध्ये सगळे साधुसंत आहेत असे दाखवण्याचा जो प्रयत्न सध्या केला जातोय तो कुणालाही पटणारा नाही.महाविकास आघाडीतील नेत्यांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी जर भ्रष्टाचार केला असेल तर त्यांच्यावर कारवाई व्हायलाच हवी पण त्याच बरोबर भाजपमध्ये जे घोटाळेबाज आहेत त्यांचीही चौकशी करून त्यांच्यावरही कारवाई व्हायला हवी.आणि तसे होणार नसेल तर महाविकास आघाडीवर आरोप करणाऱ्यांवर लोकांनी का विश्वास ठेवावा .जो किरीट सोमय्या आज भ्रष्टाचार विरोधी मोहीम चालवतोय त्यानेच पूर्वी नारायण राणेंच्या बेनामी संपती बद्दल आवाज उठवला होता पण आता राणे भाजपात जाताच सोमय्या याची वाचा बसलीय. गणेश नाईक यांच्याही भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे आहेत त्याबद्दल सोमय्या काही बोलत नाही . मुंबई बँकेतल्या घोटाळ्या बद्दल सोमय्या काही बोलायला तयार नाही .गुजरात मध्ये येवढं मोठा बँक घोटाळा झाला त्याबद्दल इथले भाजप नेते काही बोलायला तयार नाहीत तोच घोटाळा जर महाराष्ट्रात झाला असता तर सोमय्या याने थयथयाट केला असता पण गुजरात मधल्या बँक घोटाळ्याबाबत सगळे भाजप नेते गप्प आहेत.त्यामुळे भाजपची भ्रष्टाचार विरोधी मोहीम ही जनतेसाठी नाही तर सतेशी आहे हे आता लोकांना कळून चुकले आहे .पण यात महाराष्ट्राची जी बदनामी होतेय त्याचे काय?

महाविकास आघाडीचे नेते भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात गेले तरी जनतेला त्याच सोयर सुतक नाही कारण जो करेल तो भरेल! पण मग भाजपा मधल्या भ्रष्टाचारी लोकांचे काय त्यांची चौकशी चौकशी व्हायला नको का ? कारण शिवसेना भाजपा एकदा नाही तर दोन वेळा सतेत होते आणि हे जे काही घोटाळे झाले आहेत ते सर्व काही महाविकस आघाडीच्या दोन वर्षातल्या काळातले नाहीत सेना भाजपा युतीची सता असतानाच्या काळात आहेत मग तेंव्हा मिल बालके खाओ असा या लोकांचा हिशोब होता म्हणून तेंव्हा भाजपचे लोक सेनेतल्या लोकांवर आरोप करीत नव्हते पण आता युती तुटली आणि दोघांमध्ये राजकीय संघर्ष सुरू झाला तेंव्हा एकमेकांच्या उरावर बसायला लागलेत.त्यामुळे सोमय्या आणि राऊत यांच्यावर महाराष्ट्रातील जनतेने का विश्वास ठेवावा या लोकांच्या भांडणाशी महाराष्ट्रातील जनतेला काहीही घेणेदेणे नाही पण यात महाराष्ट्राची जी बदनामी सुरू आहे थांबवा .

error: Content is protected !!