ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

मुंबई ठाण्यासह मोठ्या महापालिका क्षेत्रांमध्ये बाईक टॅक्सी सेवा सुरू


मुंबई/महाराष्ट्रातील बहुतेक शहरांमधील वाहतूक कोंडीच्या प्रश्न लक्षात घेऊन सरकारने बाइक टॅक्सीला परवानगी दिली आहे याबाबतचा निर्णय 22 एप्रिल रोजी जारी करण्यात आला त्यामुळे आता मुंबई ठाण्यासह एक लाखाहून अधिक लोक उपस्थित असलेल्या सर्व महापालिका क्षेत्रात बाईक टॅक्सी धावणार आहे
बाईक टॅक्सी बाबतचा निर्णय यापूर्वीच मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता त्याचे आता अमलबजावणी सुरू झाली आहे या बाइक टॅक्सीवर चालकासह केवळ एक प्रवासी बसू शकतो त्याचबरोबर चालकाचे वय २० ते ५० वर्षापर्यंत इतकेच असणे बंधनकारक आहे बाईक टॅक्सी साधारण १५किलोमीटर पर्यंत जाऊ शकेल बाईक टॅक्सीमुळे अन्य प्रवासी वाहतुकीवरील ताण काहीसा कमी होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर सिंगल प्रवाशाला यापुढे बस किंवा टॅक्सीची वाट पाहण्याची आवश्यकता नाही तो वाईट टॅक्सीवरून आपल्याला हव्या असलेल्या ठिकाणी जाऊ शकतो त्यामुळे ही सेवा मोठ्या शहरांमधील प्रवाशांसाठी खूपच उपयुक्त ठरणार आहे

error: Content is protected !!