ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामुंबई

तेली परिवारांचा स्नेह संमेलन दिमाखात संपन्न

मुंबई -गुढी पाडव्याच्या शुभ मुहुर्तावर २ एप्रिलला लोअर परेल येथे तेली परिवाराचे एक स्नेह संमेलन आयोजित केले होते . ह्या स्नेह संमेलनात काशीराम वंजारी व सुरेन्द्र दळवी ह्यांच्या सह इतर काही जाणकार व्यकींनी लाकडी तेल घाणा व्यावसायाचे बहुमोल मार्गदर्शन केले . तेली समाजातील जास्तीत जास्त युवक युवतींनी तेल घाण्याच्या पारंपारीक व्यावसायाकडे वळायला हवं अशी कळकळ अनेकांनी व्यक्त केली . लाकडी घाणा तेल हे किंमतीच्या तुलनेत जरी महाग असलं तरी ते आरोग्यासाठी किती लाभदायक आहे तसेच त्यामुळे ते वापरल्याने आजारपण कशी टाळली जाऊ शकतात आदी गोष्टींवर मोलाचं मार्गदर्शन केल गेल . सम्राट तेली सरांच्या संकल्पनेतून तेली परिवारची निर्मिती झाली आहे . केवळ समाज बांधवांना एकत्र आणण्यासाठीच नाही तर त्यांना आर्थिक दृष्टीने कसं प्रगत करता येईल यासाठी तेली परिवार खूप छान काम करत आहे . कार्यक्रमात तेली समाजातील भगिनींनीही चांगला सहभाग घेतला . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नयना वाडेकर, रश्मी तेली,श्संभाजी . उमेश तेली. संतोष रसाळ व इतर संचालक तसेच मार्गदर्शक अनंत शेट्ये, रविकांत आंबेरकर, लक्ष्मण तेली, सावित्री माणगावकर, अनिला चौधरी व सुवर्णा लोरेकर ह्यांनी मोलाचं योगदान दिलं .
सल्लागार दत्ताराम हिंदळेकर , धनंजय कुवेसकर हेही उपस्थित होते . उपस्थितांच्या हस्ते विविध क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवणाऱ्या समाजभगिनींचा नारीशक्ती पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला . नयना वाडेकर, मानसी तीवरेकर . वासंती तेलंग , रश्मी तेली , शीतल तेली. प्रणिता सातार्डेकर, सुषमा दुर्गुडे , आद्विती तीवरेकर . सिद्धी तेली व सुनंदा मेत्रे आदींना नारीशक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं . सर्व संचालकाना त्यांचा योगदानाबद्दल प्रमाणपत्र देऊन सन्मानित केलं गेल . नव वर्षाच्या पहिल्याच दिवशी एक सुंदर कार्यक्रमाच्या माध्यमातून तेली परिवाराने उज्ज्वल भविष्याची जणू मुहूर्तमेढच रोवली .

error: Content is protected !!