ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

लोकसभेसाठी कॉंग्रेसच्या ३९ उमेदवारांची नवे जाहीर


नवी दिल्ली – काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमुळे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या उमेदवारीबाबत असलेला सस्पेन्स अखेर संपला आहे. राहुल गांधी यांना पुन्हा वायनाड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. राहुल गांधी सध्या याच मतदारसंघाचे विद्यमान खासदार आहेत. काँग्रेसने आतापर्यंत 39 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. काँग्रेसच्या निवडणूक समितीची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत १० ते ६० उमेदवारांबाबत चर्चा झाली. दिल्ली, छत्तीसगड, तेलंगणा, मणिपूर, मेघालय, त्रिपुरा, कर्नाटक, केरळ, सिक्किम आणि लक्षद्वीप इत्यादी राज्यांच्या उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. निवडणूक समितीच्या बैठकीनंतर काँग्रेसने पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत उमेदवारांच्या नावाची घोषणा झाली.
काँग्रेसच्या पहिल्या यादीत शशी थरुर यांच्या नावाचादेखील समावेश आहे. शशी थरुर यांना तिरुवनंतपुरम लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. तर डी के शिवकुमार यांना बंगळुरु ग्रामीण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. ज्योत्सना महंत यांना कोरबा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते केसी वेणुगोपाल यांना अलाफूजा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.
कॉंग्रेसच्या यादीतील काही प्रमुख उमेदवार – वायनाड – राहुल गांधी , थिरू अनंत्पुराम-शशी थरूर , रांद्जनगाव – भूपेश बघेल ,बंगळूरू – डी. सुरेश ,
अल्पुझ्झा – केसी वेणुगोपाल, कुन्नूर – सुधाकरन आदींचा समावेश आहे

error: Content is protected !!