ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

डीलाईरोड मध्ये भुरट्या चोरांचा हैदोस

मुंबई/गिरणी कामगारांचा मध्यमवर्गीय विभाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, ना.म. जोशी मार्गावरील डीलाय रोड येथे सध्या भुरट्या चोरांनी हैदोस घातलेला आहे. दिनांक 6/4/25 रोजी सकाळी 3 वाजता त्यांनी एक दुकाने फोडून दुकानातील रोकड लंपास केली. याप्रकरणी ना.म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
     ना.म  जोशी मार्गावर डी टी एस कुरिअरचे दुकान फोडण्यात आले. अज्ञात चोरांनी रात्री या दुकानातून रोकड पळवली. सकाळी दुकान उघडल्यानंतर या चोरीची माहिती उघडकीस आली. त्यानंतर दुकान मालका कडून याप्रकरणी ना.म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवण्यात आली. सध्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद चंदनशिवे यांच्या मार्गदर्शना खाली उपनिरीक्षक विजय टोपे  या चोरीचा तपास करीत आहेत. मात्र या भागात अशा तऱ्हेने भुरट्या चोरांचा हैदोस सुरू झाल्यामुळे नागरिक संतापलेले आहेत

error: Content is protected !!