ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

राहुल नार्वेकर यांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस


मुंबई- जवळपास दोन आठवड्यांपूर्वी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी निकाल दिला. यामध्ये त्यांनी दोन्ही गटाच्या आमदारांना पात्र ठरवलं. तसेच, शिंदे गटाचे व्हिप भरत गोगावले यांनाच वैध ठरवत त्यांच्याविरोधातील याचिका फेटाळल्या. यानंतर ठाकरे गटानं थेट सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. यावर आता सर्वोच्च न्यायालयाने आता राहुल नार्वेकरांच्या नावे नोटीस बजावली आहे. या नोटिशीवर उत्तर देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नार्वेकरांना दोन आठवड्यांचा कालावधी दिला आहे.
ठाकरे गटाच्या बाजूने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल युक्तिवाद करत आहेत. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती जे. बी. पार्दिवाला व न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर ही याचिका सुनावणीसाठी आली. यावेळी कपिल सिब्बल यांनी न्यायालयासमोर याचिकेचा उल्लेख केल्यानंतर न्यायालयाने खटला थेट सर्वोच्च न्यायालयात न चालवण्याऐवजी उच्च न्यायालयात चालवला जायला हवा का? अशी विचारणा केली. मात्र, त्यावर कपिल सिब्बल यांनी खटला सर्वोच्च न्यायालयात चालवण्याचीच विनंती केली.

error: Content is protected !!