ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

जियो और खुलकर बिनधास्त पियो- तीन दिवस पहाटेपर्यंत दारूची दुकाने खुली रहाणार


मुंबई – थर्टीफिर्स्टची प्लॅनींग करणाऱ्या मद्यपीसाठी एक आनंदाची बातमी आहे नाताल आणि थरटी फार्स्टला दारूची वाढती मागणी लक्षात घेऊन सरकारने २४,२५ आणि ३१ डिसेंबरला दारूची दुकाने पहाटे ५ वाजेपर्यंत उघडी ठेवण्यास परवानगी दिलेली आहे. दारू पिणाऱ्यांसाठी हि एक मोठी पर्वणी असल्याने सर्व पिणार्यांनी सरकारचे जाहीर आभार मानले आहेत.

राज्य सरकारने दिलेल्या या परवानगीमुळे मद्य प्रेमींची थर्टीफस्ट पार्टी दणक्यात साजरी होणार आहे. मद्यप्रेमींना आता २४,, २५ आणि ३१ डिसेंबर रोजी पहाटे ५ वाजे पर्यंत मद्य विकत घेता येऊ शकणार आहेत. नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेक जण ३१ डिसेंबर रोजी मद्यपान करतात आणि नववर्षाचे स्वागत दणक्यात करण्यासाठी पार्टी करतात. या काळात मद्याची मागणी असते. मद्याच्या विक्रीमुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाला आर्थिक फायदा होतो. मद्य विक्रीमुळे राज्याला महसूलही मोठ्या प्रमाणावर मिळतो. त्यामुळे या वेळ वाढवून देण्याच्या निर्णयामुळे सरकारला आर्थिक फायदा होणार आहे.
गृह विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार, सार्वजनिक शांतता, कायदा आणि सुव्यवस्था यांचा विचार करून जिल्हाधिकारी या वेळेच्या शिथिलतेबाबत निर्णय घेऊ शकतात. याचाच अर्थ जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने वेळेबाबत दिलेली सूट रद्द होऊ शकते.

error: Content is protected !!