ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

सरकार व जरंगे पाटील यांच्यातील चर्चा फिस्कटली- २४ डिसेंबरचे मराठा आंदोलन आता अटळ

जालना – सरकारचे प्रतिनिधी व जरंगे पाटील यांच्यातील चर्चा सगे सोयरे या एका शब्दावरून फिस्कटली. त्यामुळे २४ डिसेंबरला आंदोलन करण्यावर जरंगे पाटील ठाम आहे. तर खबरदारीचा उपाय म्हणून १२५ मराठा आंदोलकांना पोलिसांनी नोटीस पाठवल्या आहेत त्यामुळे जरंगे अधिकच भडकले आहेत.
राज्य सरकारचे शिष्टमंडळ आज मनोज जरांगे यांची भेट घेऊन चर्चा करण्यासाठी अंतरवाली सराटी गावात येत असताना ओबीसी आंदोलकांनी सरकार विरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली.विशेष म्हणजे हे उपोषण स्थळ मनोज जरांगे यांच्या उपोषणस्थळापासून अवघ्या एक किलो मीटर अंतरावर आहे. मनोज जरांगे यांची भेट घेऊन परत जाताना गिरीश महाजन, उदय सामंत, संदिपान भुमरे या मंत्र्यांनी ओबीसी आंदोलकांची भेट घेतली.
मनोज जरंगेंची भेट घेण्यासाठी जात असताना वडीगोद्री इथे सुरु असलेल्या ओबीसी आंदोलकांनी सरकार विरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. जरांगे यांच्या भेटीनंतर मंत्र्यांनी ओबीसी आंदोलकांची भेट घेतली. यावेळी गिरीश महाजन यांनी उपोषणाला बसलेल्या ओबीसी बांधवांच्या मनात खंत आहे की ओबीसी आरक्षणावर गदा येते की काय? मात्र मी त्यांना आश्वासित केलं की,ओबीसी आरक्षणाला धक्का न लागू देता मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे.याची खात्री आम्ही सरकार म्हणून देत आहे, असं म्हटलं
फडणवीसांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं होते ते दुसऱ्यांचं सरकार आल्याने गेलं.आता क्युरेटिव्ह पीटिशनवर निर्णय येईल.आता मागासवर्ग आयोग नेमण्यात आला आहे. मराठा समाजाला वेगळं आरक्षण देणार आहोत. या लवकर निकाल लागेल.मात्र ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, असं महाजन म्हणाले

error: Content is protected !!