ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामुंबई

… तर महापालिका निवडणुकीच्या तोंडावरच शिवसेनेत फूट अटळ

मुंबई (किसनराव जाधव) राजकारणात कुणीही कुणाचा कायमचा मित्र किंवा कायमचा शत्रू नसतो त्यामुळे स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी कोण कधी कोणाशी सोयरिक करील याचा नेम नाही.एक काळ असा होता की शिवसेनेत मोठ्या प्रमाणावर कडवे आणि निष्ठावान शिवसैनिकांची फौज होती पण सध्याचं चित्र वेगळे आहे . जिथे राज ठाकरे यांच्या सारखी रक्ताच्याचात्याची माणसे शिवसेना सोडू शकतात तिथे इतरांचे काय? आ

हे सर्व एवढ्यासाठीच सांगायचे आहे की नुकतेच स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी म्हटले होते की भाजपचे २० नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत.जर भाजपचे २० नगरसेवक शिवसेनेत जाऊ शकतात तर शिवसेनेमध्ये नाराज असलेले नगरसेवक सुधा भाजप मध्ये जाऊ शकतात याचा कदाचित यशवंत जाधव यांना विसर पडलेला असावा.
यशवंत जाधव म्हणतात त्या प्रमाणे भाजपचे २० नगरसेवक शिवसेनेत आले तर ते काही समाजसेवेसाठी शिवसेनेत येणार नाहीत तर काही तरी मिळण्याच्या अटी वरच शिवसेनेत येतील त्यातील पहिली अट म्हणजे ते ज्या वार्ड मधून भाजपच्या तिकिटावर निवडून आले होते त्या वर्डात त्यांनाच उमेदवारी मिळायला हवी . शिवाय पालिकेतील सत्ता राखण्यात शिवसेनेला यश आले तर भाजप मधील या फुटिरांचा पालिकेतील स्थायी समितीसह विविध वैधानिक समित्यांच्या अध्यक्ष पदावर दिला असेल. शिवसेनेला ते त्यांना द्यावीच लागतील. अर्थात हा झाला पालिका निवडणुकी नंतरचा भाग पण ते जेंव्हा शिवसेनेत येतील आणि त्यांना त्यांच्याच वॉर्ड मध्ये शिवसेनेची उमेदवारी दिली जाईल तेंव्हा तिथले शिवसेनेचे इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्ते गप्प बसतील का? तर अजिबात नाही! एक तर ते भाजप मध्ये किंवा दुसऱ्या पक्षात जाऊन त्या पक्षाच्या तिकिटावर त्याच वॉर्ड मधून निवडणूक लढवतील यावेळी त्यांच्या बरोबरचे जे निष्ठावान शिवसैनिक असतील त्यांनीही शिवसेना सोडली असेल विचार करा मुंबईच्या २० वार्ड मध्ये जर असे प्रकार घडले तर त्याच्या प्रतिक्रिया मुंबईच्या उर्वरित वार्ड मध्ये उमटू शकतात आणि ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत मोठी फूट पडू शकते . सध्या सेना भाजपचे बिघडलेले तणावपूर्ण संबंध पाहता शिवसैनिक खूप चिडलेले आहेत .अशावेळी भाजपा मधून शिवसेनेत येवून उमेदवारी मिळवलेल्या त्या वार्ड मधील शिवसैनिक कसा सपोर्ट करतील? शिवाय मुंबई महापालिका जिंकण्याचा चंग बांधलेल्या भाजपचे नेते तरी स्वस्थ बसतील का? शिवसेनेने त्यांचे २० नगरसेवक फोडले तर ते शिवसेनेचे ४० नगरसेवक फोडतील आणि आता मनसे सारखा मराठी मतांवर प्रभाव असलेला पक्ष सुधा भाजप सोबत आहे. तेंव्हा फोडाफोडीचे किती भयंकर परिणाम शिवसेनेला फोगावे लागतील याचा विचार यशवंत जाधव सारखे लोक करू शकत नाही . नेतृत्वाने भलता सलता विचार केल्यास शिवसेनेत मोठी फूट पडू शकते कारण अगोदरच शिवसेनेत नाराजी आहे अशावेळी दुसऱ्या पक्षातील लोकांना सेनेत घेऊन निष्ठावान शिवसैनिक कार्यकर्त्यांना डावलले तर महापालिका निवडणूक शिवसेनेला खूपच अवघड जाईल . तेंव्हा भाजपचे नगरसेवक फोडण्यापेक्षा आपल्या पक्षातील नाराज कार्यकर्त्यांना च शांत करा त्यांची नाराजी दूर करा कारण ज्यांनी दिवस रात्र मेहनत करून मतदार संघांची शिवसेनेसाठी बांधणी केलीय त्यांच्याशी पक्ष नेतृत्वाने बेइमानी केली तर तो पक्षासाठी आत्मघात ठरेल

error: Content is protected !!