ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

विशेष एक्सप्रेस गाड्यांमधून अनारक्षित तिकिटावर प्रवास करण्याची मुभा

सोलापूर – लांब पल्ल्यांच्या काही गाड्यांचा विशेष एक्स्प्रेसचा दर्जा काढल्यामुळे या पुढे या गाड्यांमधून स्वस्तात प्रवास करता येणार आहे प्रवाशांसाठी हि दिलासादायक बाब आहे.
रेल्वे मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार प्रवाशांना आता मेल एक्स्प्रेसच्या जनरल डब्यातून अनारक्षित तिकिटावर प्रवास करता येणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांचा रेल्वे प्रवास आता स्वस्त होणार आहे. पण त्यासाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रवासी जनरल डब्यांवर असलेले निर्बंध निर्बंध हटवून त्यातून जनरल तिकिटावर प्रवास करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी करीत होते. रेल्वेच्या अनेक प्रवासी संस्था आणि लोकप्रतिनिधी सुधा याबाबत पत्रव्यवहार केला होता .अखेर रेल्वे मंत्रालयाने ती मागणी मान्य केली असून रेल्वेच्या जनरल डब्यांवरील निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्यासाठी अट घातलीन आहे. ज्या दिवशी आरक्षित डब्यात आरक्षण नसेल तेंव्हापासूनच अनारक्षित तिकीटवार प्रवास करता येणार आहे. त्यामुळे जनरल डब्यातून अनारक्षित तिकिटावर प्रवास करण्यासाठी प्रवाशांना आणखी काही दिवस वाट पहावी लागणार आहे.

error: Content is protected !!