ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
गुन्हे

भिवंडीत मैत्रिणी सोबत कारमधून जाणाऱ्या तरुणावर जीवघेणा हल्ला करून लुटणारे लुटारू गजाआड..

भिवंडी दि २० मैत्रिणी सोबत कार मधून जाणाऱ्या तरुणावर अचानक जीवघेणा हल्ला करून  त्याच्या व मैत्रणीकडील मोबाईल व सोन्याचे दागिने  घेऊन फरार झालेल्या चोरट्यांना कोनगाव पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. अब्दुल कादिर अबरार शेख (वय २४ वर्षे, रा. मोईवाडा, कल्याण,प) , उमर अब्दुल रहेमान मन्सुरी ( वय २४ वर्षे, रा. गोविंदवाडी, कल्याण, प), निहाल नजीर शेख (वय २३ वर्ष रा, गोविंदवाडी, कल्याण,प) अशी अटक केलेल्या लुटारूंची नावे आहेत. तर या चोरट्यांकडून चोरीचा मुद्देमाल घेणाऱ्या दोघांनाही अटक केली आहे. आकाश राजेश कंडारे (वय २४ वर्षे),सलमान उर्फ नजीब मस्जीद शेख (वय २७ वर्ष)  असे चोरीचा मुद्देमाल विकत घेणाऱ्या अटक आरोपींचे नावे आहेत. 
 
कार समोर दुचाकी आडवी लावून लुटमारी .. 
ठाणे शहरातील पाचपाखाडी भागात राहणारे दर्शिल हितेश गुढ़का वय २७ वर्ष ) हे त्यांच्या मैत्रिणीसोबत १२ आक्टोंबरच्या मध्यरात्री मारुती  रिटस कारने  भिवडी  पाईपलाईन रोडने डोगराळीकडुन घरी ठाणे येथे जात होते. त्यावेळी अचानक रेल्वे पुलाखाली अनोळखी तिन जणांनी त्याच्या कार समोरच दुचाकी आडवी  लावून उभी केली. विचारपूस करण्यासाठी  दर्शिल कार मधून बाहेर पडताच  तिघा  चोरटयांनी  त्याचा  मोबाईल हिसकावला तसेच  मैत्रीणकडीलही  मोबाईल, तिच्या गळ्यातील सोन्याची चेन व  हातातील सोन्याची अंगठी असा एकूण ८३ हजार रुपयांचा  मुद्देमाल जबरीने  काढून घेतला.  त्यावेळी दर्शिलने  चोरट्यासोबत  प्रतिकार केला असता त्याच्या डोक्यात लाकडी दांडक्याने जोरदार प्रहार करून  मुद्देमाल घेऊन घटनस्थळावरून फरार झाले. तर  चोरट्यांच्या  हल्ल्यात दर्शिल याला गंभीर दुखापत झाल्याने त्याच्यावर ठाण्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात विविध भादवि कलमानुसार  गुन्हा दाखल  केला. मात्र याघटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातारवण  निर्माण झाले. 
 
 तीन पोलीस पथकाने शोध घेऊन आरोपीसह मुद्देमाल केला हस्तगत .. 
चोरटयांनी गुन्हा करताना निर्जनस्थळ व रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन केला होता. त्यामुळे पोलिसांकडे हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी कुठलाही सुगावा नसल्याने पोलिसांसोर  मोठ आव्हान होते. या  गुन्हयातील आरोपींचा शोध घेण्यासाठी तीन पोलीस पथके नेमली होती. त्यांनतर पोलीस  तपासात व गुप्त बातमीदारामार्फत तसेच तांत्रिक तपासाच्या आधारे  गुन्हयातील अब्दुल कादिर अबरार शेख,  उमर अब्दुल रहेमान मन्सुरी, निहाल नजीर शेख, यांना कल्याणमधून ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता, तिघांनाही गुन्हा केल्याचे कुबल केले. मात्र लुटमारीतील मुद्देमाल इतर दोघांना विक्री केल्याने मुद्देमाला हस्तगत करण्यासाठी पोलिसांनी सापळा रचून  आकाश राजेश कंडारे, आणि  सलमान उर्फ नजीब मस्जीद शेख दोघांनाही अटक करून त्यांच्याकडून चोरीचा विकत घेतलेला मुद्देमाल जप्त केला. तसेच गुन्ह्यात वापरलेली दुचाकीही जप्त केली आहे. 
 
पाचही आरोपी सराईत गुन्हेगार .. 
 गुन्हयाच्या प्रकरणी  अटक केलेल्या पाचही आरोपींचा कोनगाव पोलिसांनी अधिक तपास केला असता, आरोपी हे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याचे तपासात समोर आले. आरोपी अब्दुल कादिर अवरार शेख ३ गंभीर गुन्हे,   उमर अब्दुल रहेमान मन्सुरी ३ गुन्हे ,  निहाल नजीर शेख १४ गुन्हे आणि चोरीचा मुद्देमाला विकत घेणाऱ्या आकाश याच्यावर तब्बल  १४  गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस उपआयुक्त योगेश चव्हाण यांनी दिली. तर हा गुन्हा उघडकीस  सपोनि किरणकुमार वाघ आणि  गुहे प्रकटीकरण पथकातील पोलीस उपनिरीक्षक पराग भाट यांच्यासह पथकाने कामगीरी बजावली आहे. 

error: Content is protected !!