ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
गुन्हेमहापालिकामुंबई

दोन लाचखोर पालिका अभियंत्यांना ६ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी


मुंबई/ ओसी नसलेल्या इमारती मध्ये बेकायदेशीर नळजोडणी करून देण्यासाठी प्लंबर कडे अडिच लाखांची लाच मागणाऱ्या पालिकेच्या ई विभागातील दोन अभियंत्यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा लावून अटक केल्यानंतर न्यायालयाने त्यांना ६ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.या घटनेमुळे पालिका कर्मचाऱ्यांमध्ये मोठी खळबळ माजली आहे
भायखळा येथील एका इमारतीमध्ये नळजोडणी करायची होती त्यामुळे कंत्राटदार असलेल्या पलबरणे ई विभागाच्या कार्यालयात रहिवाश्यांच्या वतीने नालजोडणीसाठी अर्ज केला .मात्र ई विभागातील अभियंता विश्वंभर शिंदे याने ओ सी नसल्याचे कारण पुढे करून दोन लाखांची लाच मागितली होती .सुरवातीला प्लबरणे त्याला माणुसकी दाखवून नळजोडणी देण्याची विनंती केली मात्र शिंदे मानत नसल्याने .प्लंबरणे सरळ लाच लुचपत प्रतिबंधक विभाकडे तक्रार केली .त्यानंतर ए सी बी ने २ऑगस्टला सापळा रचला. शिंदे यांनी एक लाखांचा पहिला हप्ता घेऊन पलनबरला कार्यालयात बोलावले व सचिन खोदडे यांच्याकडे जायला सांगितले मात्र खोडके याने त्याला पून्हा शिंदेकडे पाठवले. त्यावर आता दोघांचे मिळून अधिक लाख द्यावे लागतील असे शिंदेने सांगितले. .प्लंबर तयार झाला व त्याने एक लाख शिंदेंना दिले आणि त्याच वेळी ए सी बी चां अधिकाऱ्यांनी शिंदेंना लाच घेताना रंगे हात पकडले त्यानंतर तसेच खोदडे यालाही ताब्यात घेतले. दोघानाही नंतर न्यायालयात उभे केले असताना न्यायालयाने त्यांना ६ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस निरक्षक प्रदीप देवकर यांनी गुन्हा दाखल केला.

error: Content is protected !!