ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोल्हापूरचा कुस्तीपटू पृथ्वीराज पाटीलची कांस्य पदकाची कमाई


ज्युनिअर वर्ल्ड चॅम्पियनशीप २०२१ स्पर्धेत महाराष्ट्राच्या युवा कुस्तीपटूनं देशाची मान उंचावली आहे. महाराष्ट्राच्या कोल्हापुर जिल्ह्यातील कुस्तीपटू पृथ्वीराज पाटील यानं स्पर्धेक कांस्य पदकाची कमाई केली आहे.मराठमोळ्या पृथ्वीराज पाटील यानं ९२ किलो वजनी गटात रशियन कुस्तीपटू इवान किरिलोव याचा २-१ असा पराभव करत कांस्य पदक पटकावलं आहे. दुसरीकडे ४ बाय ४०० मीटर मिश्र रिलेमध्ये भारतीय संघानं ३ मिनिटं २०.६० सेकंदांचा आजवरचा सर्वोत्तम वेळेची नोंद करुन नवा इतिहास रचला आहे. अब्दुल रझ्झाक, प्रिया मोहन, सम्मी आणि कपिल यांचा समावेश असलेल्या संघानं अंतिम फेरीत दमदार कामगिरीची नोंद केली.  यासोबतच नैरोबी येथे सुरू असलेल्या जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत भारताच्या ४ बाय ४०० मीटर मिश्र रिले संघानंही चमकदार कामगिरी करत कांस्य पदकावर नाव कोरलं आहे. 

error: Content is protected !!