ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामुंबईराजकीयविश्लेषण

शुध्दीकरण मनाचे आणि विचारांचे व्हावे!


शुध्दीकरण हा प्रकार वर्ण व्यवस्थेतून पुढे आलाय.कारण पूर्वी एखाद्या हलक्या जातीतल्या माणसाचा एखाद्या वस्तूला किंवा उच्च वर्णीय व्यक्तीस स्पर्श झाला की मग त्याचे ब्रम्हणाकडून शुध्दीकरण करून घेतले जायचे.पण आता जग खूप पुढे गेले आहे .जात पात तर कुणी मनिताच नाही पण एखादा माणूस चांगला आहे की वाईट आहे हे समाज ठरवतो.कुठला एक पक्ष किंवा पंथ ठरवू शकत नाही.त्यामुळे हिंदू धर्मातल्या शुध्दीकरण सारख्या जुनाट आणि बुरसटलेल्या परंपरा आता संपुटत आल्या आहेत. शुध्दीकरण जर करायचेच असेल तर मनाचे आणि विचारांचे शुध्दीकरण व्हायला हवे आज त्याचीच जास्त आवश्यकता आहे.केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्यांच्या जन आशीर्वाद यात्रेचा शुभारंभ करताना त्यांचे राजकीय गुरू आणि श्रद्धास्थान असलेल्या बाळासाहेबांच्या स्मृति स्थळाचे दर्शन घेतल्याने ते स्मृतिस्थ अपवित्र कसे झाले? आणि तशी भावना शिवसेनेत का निर्माण व्हावी? आणि राणे शिवसेनेतून गेले म्हणून ते अपवित्र झाले असे जर शिवसेनेला वाटत असेल तर राज ठाकरे आणि इतर बरेच नेते शिवसेना सोडुन गेले त्यांनीही बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृती स्थळाचे दर्शन घ्यायचे नाही का? आणि त्यांनी दर्शन घेतले तर तर त्यानंतरही शुध्दीकरण केले जाणार आहे का? शिवसेना आज महाराष्ट्राच्या सतेत आहे शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे.आणि शाहू फुले आंबेडकर यांचा महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा आहे त्यामुळे इथे शुध्दीकरण सारख्या बुरसटलेल्या संकल्पनांना अजिबात थारा नाही.आणि बाळासाहेब हे तर लोकनेते होते त्यामुळे त्यांच्या स्मृती सर्वच्या ह्रुदयात आहेत. शिवसैनिकांच्या ही ह्रुदयात आहेत आणि शिवसेना सोडून गेलेल्यांच्या हृदयातही आहेत त्यामुळे बाळासाहेबांच्या स्मृति स्थळाचे दर्शन घेण्याचा सर्वानाच अधिकार आहे.अशावेळी पूर्वी बाळासाहेबांचे सहकारी असलेले आणि शिवसेनेच्या जडणघडणीत ज्यांचा मोठा वाटा आहे त्या नारायण राणेंनी बाळासाहेबांच्या स्मृति स्थळाचे दर्शन घेतल्यास कुठे बिघडले ? आणि त्यांच्या दर्शनाने स्मृति स्थळl कसे अपवित्र झाले? याचे उत्तर पुरोगामी महाराष्ट्राचे नेतृत्व करणाऱ्या मुख्यमंत्री उद्धवठाकरे आणि महा विकास आघाडीचे संस्थापक असलेल्या शरद पवारांनी द्यावे.पवार स्वतःला सेक्युलर समजतात मग स्मृति स्थळाचे ही बुरसटलेले विचारसरणी पवारांना मान्य आहे का? त्याचबरोबर निधरमवाधाचा पायावरच ज्यांच अस्तित्व आहे त्या काँग्रेसला हे शुध्दीकरण मान्य आहे का? याचे उत्तर त्यांनी द्यावे

नारायण राणे आणि शिवसेनेचे भलेही टोकाचे मतभेद असेल तरी ते आज लोकप्रतिनिधी आहेत.केंद्रीय मंत्री आहेत आणि मुख्य म्हणजे काही काळ ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुधा होते अशा माणसाने बाळासाहेबांच्या स्मृति स्थळाचे दर्शन घेऊन त्यांच्या प्रती आपली श्रद्धा प्रकट करणे यात काहीही गैर नाही पण त्यानंतर जो स्मृति स्थळाचे जो प्रकार घडला तो महाराष्ट्राच्या पुरोगामित्वला काळिमा फसणारा होता.असे प्रकार महाराष्ट्रात यापुढे घडता नयेत आणि जर कुणी तसे करीत असेल तर त्याच्या विरोधात महाराष्ट्रातील जनतेने आवाज उठवायला हवा कारण बाळासाहेबांच्या सारखे लोकनेते हे सर्वांसाठी आदरणीय असतात त्यामुळे त्यांच्यावर विश्वास कुठल्या एका पक्षाचा किंवा समाजाचा अधिकार नसतो.हे शिवसेनेने ध्यानात ठेवायला हवे.आणि एखाद्या व्यक्तीच्या स्पर्शाने काहीही अपवित्र होत नसते.पवित्र आणि अपवित्र या कल्पनाच भ्रामक आणि बुरसटलेल्या आहेत.त्या पुरातन काळात ठीक होत्या सध्याच्या काळात अशा गोष्टींना कुणीही थारा देत नाही.नारायण राणे शिवसेनेसाठी चुकीचे असतील कारण ते त्यांचे राजकीय विरोधक आहेत.पण केंद्रीय मंत्री आणि लोकप्रतिनिधी म्हणून महाराष्ट्रासाठी आदरणीय आहे.त्यामुळे अशा आदरणीय व्यक्तीने बाळासाहेबांच्या स्मृति स्थळाचे दर्शन घेतल्याने ते अपवित्र झाले असे ज्यांना वाटत असेल त्यांना या पुरोगामी महाराष्ट्रात राहण्याचा जराही अधिकार नाही.

error: Content is protected !!