ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामनोरंजनमुंबई

वस्रहरण नव्या संचात रंगभूमीवर – लेखक गवाणकर सरपंचाच्या भूमिकेत

प्रतिनिधी /मुंबई – नाटक संगीत वस्त्रहरण
सातासमुद्रापार नावलौकिक झालेले, विश्वविक्रमी, तसेच अस्सल मालवणी भाषेतून साकारलेले एकमेव धमाल विनोदी नाटक संगीत वस्त्रहरण ज्यांच्या लेखणीतून आजरामर झालेले असे आदरणीय माडबनगावचे सुपुत्र * गंगाराम गवाणकर (नाना)* यांनी स्थानिक माडबन गावचे युवा कलाकार घेऊन नव्या उमेदीने पुन्हा रंगभूमीवर स्वतः तात्या सरपंच यांची भूमिका वयाच्या पंच्याअंशीव्या वर्षी सुध्दा तारुण्याला लाजवेल अशी अप्रतिम करीत आहेत. ते पाहण्याचे आपले भाग्यच. तसेच माडबन गावचे नवीन होतकरू उमदे कलाकार यांच्या मुंबई येथील पहिल्या नाट्यप्रयोगाला ग्रामस्थबंधुनी आवर्जून उपस्थित राहून त्यांच्या कलाअविष्काराचा आनंद लुटावा.

तेंव्हा गाववाल्यांनु वस्त्रहरण नाटक रविवार २३ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता रविंद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी मुंबई येथे बघुक येवक विसरु नका ,येवाआणि पॅाटभर हसा.

मुख्य मार्गदर्शक गंगाराम गवाणकर ( नाना )
सुत्रधार शैलेश वाघधरे मो.नं.८३६९८७२१५०
तिकीट संपर्क विनोद शिर्सेकर
मो.नं. ८४२२०३९७३७
सुहागन साडी( साड्यांचे दुकान) ६, हरया हाऊस सेंट पाॅलिस्ट्रिट हिंदमाता सिनेमाच्या समोर, दादर (पूर्व) मुंबई १४ यांच्याकडे या ठिकाणी तिकीट उपलब्ध आहेत.

तसेच तीन दिवस अगोदर रविंद्र नाट्यमंदिर दादर येथे तिकीटे उपलब्ध राहतील.

error: Content is protected !!