ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

रस्त्याच्या कामात कंत्राटदाराला निधी वाढवून देण्याचा पालिका अधिकाऱ्यांचा झोल फसला


मुंबई/ पालिकेत कंत्राटदार आणि पालिका अधिकारी यांच्या अभद्र युतीमुळे मुंबईकरांचा पैसा कसा लुटला जातो हे अनेक वेळा उघडकीस आले आहे .आणि रस्त्याची कामे म्हणजे नोटा छापण्याची मशोनच असते.मुंनबईच्या रस्त्यांच्या कामात झालेला भ्रष्टाचार हा भारतातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार आहे.रस्त्याच्या कामात असाच एक मोठा झोल होणार होता पण अतिरिक्त आयुक्तां मुळे तो फसला.
नागरी सुविधांच्या विविध कामांसाठी रस्त्यावर चर खोदले जातात ते बुजविण्यासाठी पालिकेने 2022 मध्ये 385 कोटींचा निधी मंजूर केला .मात्र तो निधी संपल्यानंतर त्या कामासाठी नव्या निविदा काढण्याऐवजी त्याच कंत्राटदाराला 150 टक्के निधी वाढवून देण्याचा घाट घालण्यात आला होता.संबंधित कंत्राटदार आणि त्याचे दलाल म्हणून काम करणारे काही पालिका अधिकारी यांनी तसा प्रयत्न चालवला होता पण अतिरिक्त आयुक्तांनी चर बुझवण्याच्या कामाच्या नव्याने निविदा काढण्याचे आदेश दिले त्यामुळे चर बुझावण्याच्या नावाखाली पालिकेच्या तिजोरीवर दरोडा टाकण्याच्या कंत्राटदार आणि पालिका अधिकाऱ्यांचा डाव फसला

error: Content is protected !!