ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
गुन्हेताज्या बातम्यामहाराष्ट्र

फाशीची मागणी करणाऱ्या नागरिकांकडून न्यायालयाच्या निर्णयावर तीव्र नाराजी-अंकिताला जिवंत जळणाऱ्या नराधमाला जन्मठेप!



हिंगणघाट/ संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या हिंगणघाट जाळीत कांड प्रकरणातील क्रूरकर्मा आरोपी विवेक नगराळे याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे मात्र आरोपीला फाशीचीच शिक्षा द्यावी अशी मागणी करीत लोकांनी न्यायालयाच्या बाहेर तीव्र संताप व्यक्त केला
३ फेब्रुवारी २०२० रोजी हिंगणघाट येथे एकतर्फी प्रेमातून अंकिता अरुण पिसुदे या प्राध्यापिका असलेल्या तरुणीला विवेक उर्फ विक्की नगराळे या नराधमाने पेट्रोल ओतून जिवंत जाळले होते यात गंभीररीत्या होरपळलेल्या अंकिता हिला सुरवातीला स्थानिक रुग्णालयात आणि नंतर नागपूरला मोठ्या रुग्णालयात उपचारा साठी दाखल करण्यात आले होते पण१० फेब्रुवारीला तिचा मृत्यू झाला तत्पूर्वी विवेकला पोलिसांनी अटक केली होती दरम्यान या भयंकर घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता आणि आरोपी नगराळे याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली सरकारने हा खटला जलदगती न्यायालयात चालवला जाईल असे जाहीर करून या खटल्यासाठी सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती केली पुढे हिंगणघाट जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर बी भागवत यांच्या न्यायालयात झाली यावेळी उज्वल यांनी सर्व साक्षी पुरावे न्यायालयात सादर करून आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती पण न्याल्याने जन्मठेप दिली त्यावर लोक नाराज आहेत

error: Content is protected !!