ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

जी साऊथ मधील लाचखोर पालिका अधिकाऱ्याला अटक


मुंबई/आशिया खंडातील सर्वात मोठी श्रीमंत महापालिका असा मुंबई महापालिकेचा लौकिक आहे.पण जिथे पैसा असतो तिथे चोर चांडाळ सुधा असतात.मुंबई महापालिका तर या चोर चांडाळ लोकांनी भ्रष्टाचार करून बदनाम केली आहे.अनलीगळ कामासाठी तर हे लोक पैसे घेतातच पण कायद्यात बसणारे काम असेल तरी ते रखडवून पैसे काढतात.मुंबईच्या जी साऊथ पालिका कार्यालयात अशीच एक घटना घडली आहे .वरळीच्या झोपडीचे एस आर ए योजने अंतर्गत पुनर्वसन करताना तिथल्या झोपड्या तोडण्यात आल्या त्यानंतर 7/9/2022 रोजी सहाय्यक आयुकत्ताचा सक्षम अधिकारी यांनी 20 झोपडी धारकांची पात्रता निश्चित केली. त्यानंतर पात्रता आदेशाची प्रत मिळवण्यासाठी एका लाभार्थी महिलेने जी साऊथ कार्यालयाचे उंबरठे झिजवत फिरली पण ती प्रत देण्यासाठी पालिकेचे वसाहत अधिकारी निरंजन गुंडुका यांनी दीड लाखांची लाच मागितली व शेवटी एक लाखांवर तडजोड झाली .दरम्यान लाभार्थी झोपडी धारक महिलेने या प्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार नोंदवली त्यानंतर 6/10/2023 रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा लावला व 80,000 रुपये लाचेची रक्कम मागताना निरंजन गुंदुका याला अटक केली

error: Content is protected !!