ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
महाराष्ट्र

कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी मनसेचे आमरण उपोषण.

उल्हासनगर / प्रतिनिधी : अंबरनाथ मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार कर्मचारी सेनेने कामगारांच्या विविध मागण्यांसाठी उपोषण सुरू केले आहे .कोरोनाच्या संकटात जीवाची पर्वा न करता काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अंबरनाथ नगर परिषदेने वाऱ्यावर सोडल्याने कर्मचाऱ्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी मसनेने हे उपोषणाचे हत्यार उपसले आहे.
यापूर्वी अंबरनाथ नगरपरिषद प्रशासन व युनियनच्या पदाधिकाकाऱ्या सोबत झालेल्या बैठकी दरम्यान प्रशासनाने कामगारांच्या मागण्या निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिल्यामुळे होणारे ठिय्या आंदोलन प्रशासनावर विश्वास ठेवून स्थगित केलेले होते.
परंतु आता प्रशासनाने लेखी दिलेले आश्वासन निर्धारित वेळेत पूर्ण न केल्यामुळे कर्मचाऱ्या मध्ये तीव्र प्रकारचा असंतोष पसरलेला आहे.त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार कर्मचारी सेनेने अंबरनाथ मध्ये विविध मागण्यांसाठी उपोषण सुरू केले आहे.सातव्या वेतनाच्या फरकाचा पहिला हप्ता आणि दुसरा हप्ता कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीत व्याजासह तत्काळ जमा करण्यात यावा.कोविड काळात कर्मचाऱ्याना शासकीय नियमाप्रमाणे मिळणारे कोविड भत्याची पूर्ण रक्कम त्वरित जमा करण्यात यावी.अकाली निधन पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर त्वरित कामावर रुजू करून घ्यावे. स्वच्छता निरीक्षक.विलास भोपी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी.सुर्यकांत जयराम अनार्थे अध्यक्ष अंबरनाथ युनिट संगीता मोहन चेंदवणकर अध्यक्षा बदलापूर युनिट. मनोज महादेव शेलार अध्यक्ष मनविसे उल्हासनगर शहर. गौरव विजयसिंग राजपूत सह सचिव- मनसे अंबरनाथ शहर आमरण उपोषणास बसले आहेत .

error: Content is protected !!