ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

भगवा फडकतोय तोवरच हिंदू सुरक्षित आहे – नितेश राणे

सोलापूर/ आम्हाला बहुसंख्य हिंदू समाजाने निवडून दिलेले आहे त्यामुळे हिंदूंच्या न्याय हक्कासाठी आम्ही लढणार आणि जोवर भगवा फडकतोय तोवर हिंदू सुरक्षित आहे असे राज्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी सोलापूर येथील एका कार्यक्रमात सांगितले.
या कार्यक्रमात बोलतानाआमदार सचिन कल्याणशेट्टी म्हणाले काळाची पावलं ओळखून जातीपाती सोडा आणि हिंदू म्हणून एकत्रित या, असे आवाहन केले.
आमदार गोपीचंद पडळकर यांनी अत्यंत आक्रमकपणे विचार मांडले लव्ह जिहाद हा फार मोठा धोका आहे आता जमिनीवर हक्क सांगत आहेत जन्म नियंत्रण आणि धर्मांतरण कायदा आला पाहिजे. आमदार बसवनगौडा पाटील यांनी कर्नाटक महाराष्ट्र वाद निर्माण करणार्यावर टीका केली छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्नाटक संबंध सांगितला. महाराष्ट्रात भाजपा यश मिळाले ते हिंदू जनजागृती झाल्याने. त्याने वीरशैव आणि लिंगायत हे हिंदू आहेत एकीचे बळ महत्वाचे आहे.
मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी अत्यंत आक्रमकपणे विचार मांडले डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची घटना सर्वांना सारखाच न्याय देते तो मान्य करायलाच हवा आमचं सरकार हिंदू समाजाने निवडून दिले.मैंदर्गी येथे लॅन्ड जिहाद चालू आहे.भगवा फडकतोय तो वर हिंदू सुरक्षित आहे.एकातरी मोहल्यात शिवजयंती साजरी होते का ॽ अधिकार्यांनी योग्य भूमिका घ्यावी. अतिक्रमण करण्याची हिंमत कशी करतात या विराट सभा ऐकली झोपी गेला असे नको जागृत रहा, असे आवाहन केले.

error: Content is protected !!