ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय

मनसे भाजपची युती होणार पाण्यासाठी दोन्ही पक्षांचा एकत्र मोर्चा

मुंबई/ मनसे आणि भाजपा यांच्यातील संबंध आता किती घट्ट झाले आहेत.याची प्रचिती अखेर काल आली. पाण्यासाठी दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन कल्याण डोंबिवली महापालिकेवर मोर्चा काढला आणि आमचे आता जुळले आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिले आहे
सध्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजप आणि मनसे यांच्यात खूपच जवळीक निर्माण झाली आहे .मात्र या दोन्ही पक्षांच्या युतीबाबत स्पष्टपणे बोलायला दोन्हीकडचे नेते तयार नाहीत.पण राज ठाकरेंच्या भोंगा बाबतच्या भूमिकेला भाजपने जाहीर पाठिंबा दिला आहे तसेच अयोध्येला निघालेल्या राज ठाकरेंना विशेष संरक्षण दिले जाणार आहे .त्यामुळे मनसे आणि भाजप आता एकत्र आहेत अशी चर्चा होती त्यावर कालच्या मोर्चाने शिक्कामोर्तब झाले काल मनसेचे आमदार राजू पाटील आणि भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण या दोघांनी एकत्र येऊन पाण्यासाठी कल्याण दोंबवली महापालिकेवर मोर्चा काढला यावेळी दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते त्यामुळे भविष्यात मनसे आणि भाजप यांची युतीहोनार हे संपूर्ण महाराष्ट्राला कळले आहे .

error: Content is protected !!