ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकीय

अफगाणिस्तानातून १३० भारतीय मायदेशी


मुंबई/ तालिबान्यांनी अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर तिथे राहणे अवघड असल्याने अनेक देशांनी आपा आपल्या नागरिकांना त्यांच्या मायदेशी नेण्याची तयारी चालवली असून काल १३० भारतीय अफगाणिस्तानातून भारतात परतले मात्र अजून बरेच भारतीय अफगाणिस्तानात अडकले आहेत आणि त्यांना आणण्यासाठी सर्व प्रयत्न केले जाणार आहेत
काल सर्वात प्रथम अफगाणिस्तानातील भारतीय दूतावासात काम करणारे अधिकारी कर्मचारी आणि इतर मिळून १३० नागरिकांना आणण्यात आले.काल सकाळी ७.४६वाजता भारताचे एक विमान काबूल विमानतळावरून निघाले आणि ११ वाजता सुरक्षित भारतात पोचले. मात्र अजून बरेच जण तेथे अडकले असून त्यात काही प्रकल्पावर काम करणाऱ्या अभियंते आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे .तालिबान ने भलेही त्यांच्या सुरक्षेची हमी दिलेली असली तरी सध्या अफगाणिस्तान मध्ये राहणे खूप धोकादायक आहे

error: Content is protected !!