[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

विक्रोळी उड्डाण पूल १४ जून पासून वाहतुकीस खुला


मुंबई/मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या विक्रोळी रेल्वे स्थानकाजवळील उड्डाणपुलाचे बांधकाम नियोजित कालावधीत पूर्ण केल्‍याबद्दल मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बृहन्‍मुंबई महानगरपालिकेचे अभिनंदन केले आहे. तसेच, पावसाळ्याचे दिवस लक्षात घेता, तसेच नागरिकांची गैरसोय होऊ नये या उद्देशाने कोणत्‍याही औपचारिक समारंभाची वाट न पाहता विक्रोळी पूल नागरिकांसाठी खुला करण्याचे आदेश मुख्‍यमंत्री फडणवीस यांनी महानगरपालिका प्रशासनास दिले आहेत. मुख्यमंत्री महोदयांसह उपमुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांच्‍या संमतीने महानगरपालिकेला प्राप्‍त झालेल्‍या या आदेशानुसार शनिवारी १४जून २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजेपासून विक्रोळी पूल वाहतुकीस खुला केला जाणार आहे.महानगरपालिका आयुक्‍त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्‍या मार्गदर्शनाखाली आणि अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त अभिजीत बांगर यांच्‍या नेतृत्‍वाखाली विक्रोळी उड्डाणपुलाची उभारणी विहित कालमर्यादेत म्‍हणजेच 31 मे 2025 रोजी पूर्ण करण्‍यात आली आहे. पूर्व उपनगरातील विक्रोळी येथील रेल्वे मार्गावरून जाणाऱ्या उड्डाणपुलामुळे पूर्व – पश्चिम बाजू जोडली जाणार आहे. या पुलामुळे विक्रोळी पश्चिमेकडील लाल बहादूर शास्त्री मार्ग आणि विक्रोळी पूर्व बाजूस पूर्व द्रुतगती महामार्ग जोडले जाणार आहेत. परिणामी, प्रवास वेळेत सुमारे 30 मिनिटांची बचत होणार आहे.

error: Content is protected !!