ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामहाराष्ट्रमुंबई

प्रभाग रचना तयार ठेवा – मुंबईसह 14 महापालिकांना निवडणूक आयोगाचे आदेश

मुंबई- मा.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने महानगरपालिका निवडणुकांसदर्भात आज महत्त्वाचे आदेश काढले आहेत.

नवी मुंबई, वसई-विरार, उल्हासनगर,कोल्हापूर, अकोला अमरावती, नागपूर सोलापूर, नाशिक,पुणे, पिंपरी-चिंचवड, कल्याण-डोंबिवली,बृहन्मुंबई, ठाणे या महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीची अंतिम प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश राज्य निवडनुक आयोगाने राज्यातील सर्व महापालिकांच्या आयुक्तांना काढले आहेत.
त्यानुसार अंतिम प्रभाग रचनेचे कामकाज येत्या दि:-११-मे पर्यंत पूर्ण करावे. दि:-१२-मे रोजी प्रभाग रचना निवडणूक आयोगास सादर करावी. त्यानंतर दि:-१७-मे रोजी अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध केली जाणार आहे, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.आज मंगळवारी हे आदेश दिले आयोगाचे महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे उपायुक्त अविनाश सणस यांनी काढले .

अंतिम प्रभाग रचना शासन राजपत्रात प्रसिध्द करण्याचा कार्यक्रम.नुसार,महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभागांच्या सिमा निश्चित करण्या बाबत

१- प्रारुप प्रभाग रचनेस राज्य निवडणूक आयोगाची मान्यता दि:-२८-जानेवारी-२०२२ रोजी देण्यात आली.
२-प्रारुप प्रभाग रचना दि:-१-फेब्रुवारी-२०२२-रोजी शासन राजपत्रात प्रसिध्द करण्यात आली.
३- प्रारुप प्रभाग रचनेवर दि:-१-फेब्रुवारी-२०२२-ते दि:-१४-फेब्रुवारी-२०२२-या कालावधीमध्ये हरकती व सूचना मागविण्यात आल्या.
४- प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांवर राज्य निवडणूक आयोगाने नियुक्त केलेल्या प्राधिकृत
अधिकाऱ्यांमार्फत दि:-१७ ते-२६-फेब्रुवारी-२०२२ या कालावधीत सुनावणी देण्यात आली.
५- सुनावणीनंतर प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या शिफारशी नमूद केलेला अहवाल महानगरपालिकेमार्फत राज्य निवडणूक आयोगास दि:-५-मार्च, २०२२-पर्यंत सादर
करण्यात आला.

२. महानगरपालिकेने सादर केलेल्या अहवालाची तपासणी राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयात सुरु असताना दि:-११ मार्च-२०२२-रोजी शासनाने प्रभाग रचनेच्या अनुषंगाने अधिनियमात दुरुस्ती केल्यामुळे
त्याबाबत आयोगाने पुढील कार्यवाही थांबविली होती. शासनाने अधिनियमात केलेल्या सदर दुरुस्तीच्या अनुषंगाने मा सर्वोच्च न्यायालयात विविध याचिका दाखल झाल्या. या सर्व याचिका विशेष अनुमती याचिका सिव्हील-क्र. १९७५६/२०२१ सोबत संलग्न करुन त्यावर सुनावणी झाली.त्यामध्ये दि:-४-मे-२०२२-रोजी मा. सर्वोच्च न्यायालयाने, आयोगाने दि:-१०-मार्च, २०२२-रोजी ज्या टप्यावर निवडणुकांची प्रक्रिया स्थगित केली होती, तेथून पुढे सुरुवात करुन निवडणूक कार्यक्रम घोषीत करण्याचे निर्देश दिले आहेत.

३. उपरोक्त वस्तुस्थिती विचारात घेता प्रभाग रचनेची कार्यवाही तात्काळ पूर्ण करणे आवश्यक असल्यामुळेमहानगरपालिकेच्या संबंधित अधिकारी-कर्मचारी यांना राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयात दि:-६-ते-१०-मे-२०२२-या कालावधीत उपस्थित राहून अंतिम प्रभाग रचना प्रसिध्दीच्या अनुषंगाने उर्वरित कामकाज पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या.प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या सर्व शिफारशींचा सखोल अभ्यास करुन आयोगाने आता वरील-१४ महानगरपालिकांच्या प्रभाग रचना अंतिम केल्या आहेत.सदर अंतिम प्रभाग रचना शासन राजपत्रात प्रसिध्द करण्याच्या अनुषंगाने सोबतच्या परिशिष्ट-१-मध्ये दर्शविल्यानुसार पुढील कार्यक्रम राबविण्यात येऊन आयोगास कळवावे. असे आदेश दिले आहेत

error: Content is protected !!