ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
महाराष्ट्र

महा विकास आघाडीच्या नेत्यांना अडकविण्यासाठी ८ महिन्या पूर्वी झाली बैठक

सत्तातराचा पर्दाफाश
जळगाव/ महा विकास आघाडीच्या नेत्यांना वेगवेगळ्या गुन्ह्यात कशा प्रकारे अडकवता येईल यासाठी भाजपच्या बड्या नेत्यांनी ८महिन्या पूर्वीच एक बैठक झाली होती असा सनसनाटी खुलासा राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केला असून त्यांच्या या खुलाशामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे
महाराष्ट्रात शिवसेना कोंग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षाच्या महा विकास आघाडीचे सरकार आहे मात्र महा विकास आघाडीचे हे सरकार पाडण्यासाठी विरोधी पक्षाकडून गेल्या दीड वर्षात विरोधी पक्षाच्या हालचाली सुरू असल्याचे समजते.आणि त्यासाठीच गेल्या काही महिन्यांपासून महा विकास आघाडीच्या नेत्यांच्या मागे ई डी,सीबीआय,आय टी यासारख्या तपास यंत्रणांचा सासेमिर लागलेला आहे यात सेनेचे अडसूळ,भावना गवळी,प्रताप सरनाईक ,संजय राऊत यांच्या पत्नी,तर राष्ट्रवादीचे मुश्रीफ,अनिल देशमुख आणि काँग्रेसच्या सुधा काही नेत्यांचा समावेश आहे मात्र याबाबतचे शढ यंत्र ८ महिन्या पूर्वीच रचण्यात आले होते आणि त्यासाठी भाजप नेत्यांची एक बैठक झाली होती असा खुलासा राष्ट्रवादीचे जामखेड कर्जत चे आमदार रोहित पवार यांनी केला आहे मात्र या बैठकीला भाजपचे कोण कोण बडे नेते होते ते मात्र त्यांनी सांगितले नाही रोहित पवार हे जळगाव जिल्ह्याच्या दोन्यावर आले होते यावेळी जिल्ह्याच्या राष्ट्रवादी कार्यालयात त्यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा केली यावेळी बोलताना त्यांनी हा गौप्यस्फोट केला

error: Content is protected !!