ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

राज्यसभेसाठी महायुतीचे उमेदवार जाहीर -अशोक चव्हाण मिलिंद देवराना उमेदवारी


मुंबई – राज्यसभेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची गुरुवारी शेवटची तारिख आहे. दरम्यान, महायुतीचे सर्व उमेदवार उद्या एकत्रित येत अर्ज भरणार आहेत. महायुतीचे सर्व उमेदवार उद्या दुपारी 1 वाजता अर्ज भरतील, यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित असणार आहेत. उमेदवार जाहीर केल्यानंतर आता महायुती अॅक्शन मोडमध्ये आली आहे.
राज्यसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. अजित पवार गटाकडून अद्याप उमेदवार जाहीर केला नसला तरी भाजप आणि शिंदे गटाकडून आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. भाजपकडून अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि डॉ. अजीत गोपछडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर शिंदे गटाकडून काँग्रेसमधून नुकतेच आलेल्या मिलिंद देवरा यांना उमेदवारी दिली आहे. महायुतीकडून आत्तापर्यंत एकूण चार उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. एकीकडे भाजपने अशोक चव्हाण यांच्या रुपाने बाहेरुन आलेल्या नेत्याला लगेच राज्यसभेवर पाठवले. त्यामुळे भाजपचे निष्ठावंत आणि सामान्य केडरमध्ये नाराजी पसरण्याचा धोका होता. परंतु, त्याचवेळी मेधा कुलकर्णी आणि अजित गोपछडे या निष्ठावंतांना संधी देऊन भाजप नेतृत्त्वाने एकप्रकारे बॅलन्स साधला आहे. राष्ट्रवादीने प्रफुल्ल पटेल यांना उमेदवारी दिली आहे तर कॉंग्रेसकडून चंद्रकांत हंडोरे उमेदवार असतील

error: Content is protected !!