ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

आजचा निश्चय, पुढचं पाऊल” या ७४ पानी पुस्तिकेच्या मुखपृष्ठाचे अनावरण

मुंबई; -अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने ज्ञानाची आस, गुणवत्तेचा विकास, व्यावसायिकतेचा ध्यास या अनुषंगाने “आजचा निश्चय, पुढचं पाऊल” या ७४ पानी पुस्तिकेच्या
मुखपृष्ठाचे अनावरण आज मुंबई मराठी पत्रकार संघात करण्यात आले.ही पुस्तिका
शिव जयंतीदिनी प्रसिध्द करणार असल्याची माहिती अखिल भारतीय मराठा महासंघाच्या
वतीने देण्यात आली.

मराठा समाजाला आज ज्ञानसंपत्ती, गुणात्मकतेची व्यावसायिकतेची मोठी गरज आहे. त्यासाठीची ही जनजागृती मोहीम आहे. या पुस्तिकेमध्ये ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञानातील स्वीकारार्ह बदल, आरक्षण, विवाह सोहळे, कुटुंबसंस्था, जमिनीचे रेकार्ड कसे ठेवाल, प्रगत शेती, विधिसाक्षरता, अर्थसाक्षरता, नको नुसत्याच MPSC च्या वाटा, स्मार्ट फोन सोशल मिडियाचा वापर, विविध प्रकारचे शासकीय दाखले, केंद्र व राज्य सरकारच्या व विविध महामंडळांच्या कर्ज योजना, विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेल्या शासकीय आणि खाजगी १२५ शिष्यवृत्तींची माहिती, प्रक्रिया उद्योग, वसतिगृह, निर्वाह भत्ता, अशी उपयुक्त माहिती या पुस्तिकेत प्रसिध्द करण्यात येणार आहे. अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांची संकल्पना आहे. या पुस्तिकेच्या माध्यमातून राज्यभरात महासंघाचे कार्यकर्ते प्रत्यक्ष कुटुंबाना भेट देऊन वितरीत करणार आहेत. त्यामुळे सुमारे ३ लाख व्यक्तींच्या पर्यंत समाज संघटन व सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, व्यावसायिक जागृतीसाठी

हा उपक्रम असून आपल्या जिल्ह्यामध्ये महासंघाचे सर्व पदाधिकारी सभासद हे जनजागृतीसाठी घरोघर संपर्क साधणार आहेत. या पुस्तिकेच्या माध्यमातून QR Code च्या द्वारे नामवंत व्यक्तींच्या समाजाला संदेश तसेच विविध प्रकारची माहिती महासंघातर्फे बांधवांपर्यंत पोहोचवली जाणार आहे.

आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे वित्तीय सल्लागार डॉ. गिरीष जाखोटिया, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे, माजी कुलगुरु पुणे विद्यापीठ डॉ. अरुण अडसुळ, ज्येष्ठ विधिज्ञ मा. उज्वल निकम, ज्येष्ठ कृषी तज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक, महाराजा सयाजीराव गायकवाड संशोधन संस्था मा, बाबा भांड, अध्यक्ष बीव्हीजी ग्रुप पुणे मा. हनुमंतराव गायकवाड, अध्यक्ष सह्याद्री फार्म नाशिक मा. विलास शिंदे, चेअरमन मगरपट्टा सिटी पुणे मा, सतीष मगर, अध्यक्ष ग्लोबल कोकण स्वराज्य भूमी अभियान मा. संजय यादवराव, इतिहास संशोधक मा. इंद्रजीत सावंत, संवाद कौशल्य, वकृत्व कला प्रशिक्षक मा. शशांक मोहिते इ. मान्यवरांचे संदेश या पुस्तिकेच्या मुखपृष्ठावरुन दिले आहेत व यापुढे देणार आहोत.

error: Content is protected !!