चोरी केली तर शिक्षा होणार- सोमया
मुंबई- नवाब मलिक यांनी वकफ बोर्डाच्या जमिनी ढापल्या आहेत. हा घोटाळा बाहेर आला म्हणून ते हात पाय मारत आहेत. त्यांच्या घरी सरकारी पाहुणे नक्की जाणार असा टोला भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी काल लगावला. चोरी केली तर शिक्षा होणार अशी टीकाही त्यांनी केली.
राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी ट्विट केले. यावर उत्तर देताना सोमय्या म्हणाले की मलीक ट्विट करतात कारण त्यांना भीती वाटते .पुण्यात नवाब मलिक याने वकफ बोर्डात घोटाळा केला आही. ही जमीन नातेवाईक यांच्या नावे केली त्यामुळे त्यांना भीती वाटते प्रेशर करून घोटाळा लपत नाही चोरी केली तर शिक्षा होणार