ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामुंबई

गिरगाव चौपाटी येथे मनसेची स्वच्छता मोहिम

समुद्र किनारा केला कचरा मुक्त

मुंबादेवी:11(बातमीदार) मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांच्या संकल्पनेतून राज्यातील सर्व समुद्र किनारे आणि चौपाटया स्वच्छ करुन पर्यावरणाचे रक्षण करण्याची मोहिम आज सकाळी 11:30 वाजता गिरगाव चौपाटी तसेच दादर चौपाटी येथून सुरु करण्यात आली.
गिरगाव चौपाटी येथे मनसेचे नेते आणि माजी गृहराज्यमंत्री बाळा नांदगावकर यांनी दिवंगत चीफ डिफेंस स्टाफ जनरल बिपिन रावत यांच्या चित्रास पुष्पांजलि अर्पित करुन शेकडो मनसैनिकांना सोबत घेत स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ केला.मनसेच्या सचिव सुप्रिया दळवी
मनसेचे मलबारहिल विभाग अध्यक्ष धनराज नाईक,केशव मुळे,शेखर, गव्हाणे,श्रीधर जगताप, दिनेश पुंड़े,परेश मोघे आणि असंख्य सदस्य, महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
या प्रसंगी बाळा नांद गावकर यांनी महाराष्ट्र प्रदूषण मुक्त तसेच पर्यावरणाच्या दृष्टीने स्वच्छ समुद्र,वनराईने भरलेले जंगल,स्वच्छ नदया – तलाव आणि शुद्ध हवा यामुळे निसर्गाच्या सनिध्यात असणारे सजीव सुरक्षित राहतील. पर्यावरण सुरक्षित राहिले तरच मानव राहतील, पर्यावरण चा -ह्रास समुदात होणारे भराव, डोंगर तसेच वृक्ष तोड़, नदी,तलाव आणि समुदात पाण्यात होणारे रासायनिक प्रदूषण रोखणे अत्यंत महत्वाचे असून आगामी काळात मनसे या संदर्भात मोठी पर्यावरण रक्षण मोहिम राबवेल असे म्हटले.

गिरगाव चौपाटी स्वच्छते साठी मनसे सोबत येथे आलेले विल्सन कॉलेज विद्यार्थिही सामील झाले होते.

error: Content is protected !!