ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामुंबई

महापौरांना धमकीचे पत्र लिहिणारा अखेर सापडला

मुंबई/ महापौर किशोरी पेडणेकर यांनी धमकीचे पात्र लीहणारा इसम अखेर सापडला असून तो वकील आहे. विजेंद्र म्हात्रे असे या वकिलाने नाव असून तो उरण मधील आहे आणि पनवेल मधून त्याने हे पात्र पोस्ट केले होते आता तपास यंत्रणा त्याच्यावर कायदेशीर कारवाई करतील
दोन दिवसांपूर्वी महापौर किशोरी पेडणेकर यांनी त्यांच्या महापौर बंगल्याच्या पत्त्यावर एक धमकीचे पात्र आले होते अत्यंत अर्वाच्च भाषेत लिहलेल्या या पत्रात महापौर आणि त्यांच्या कुटुंबीयांना ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती तसेच शरीराच्या अवयवांची विटंबना करू असा अश्लील भाषेतील मजकूरही त्या पत्रात होता त्यामुळे या पत्राची पोलिसांनी गंभीर दखल घेऊन अखेर हे पात्र लीहणाऱ्याला शोधून काढले आहे आता त्याच्यावर काय कारवाई होते ते लवकरच कळेल

error: Content is protected !!