ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

दहिसरमध्ये महानगर गॅस वाहिनीला गळती

मुंबई : दहिसर पूर्व येथील जरीमरी गार्डन आनंद नगर येथे शुक्रवारी दुपारी महानगर गॅसच्या वाहिनीला गळती सुरू झाली. गटाराचे काम सुरू असताना पालिकेच्या कंत्राटदाराच्या चुकीमुळे या वाहिनीला धक्का लागला व वाहिनीचे नुकसान झाले. त्यामुळे या संपूर्ण परिसरातील गॅस पुरवठा तब्बल पाच सहा तासांसाठी बंद करावा लागला. दहिसर परिसरातील १०० हून अधिक इमारतींचा गॅस पुरवठा खंडीत झाल्यामुळे रहिवाशांचे हाल झाले
मुंबई महापालिकेच्या कंत्राटदाराकडून गटारासाठीचे काम दहिसर परिसरात सुरू आहे. हे काम सुरू असताना महानगर गॅस वाहिनीला धक्का लागून वाहिनीचे नुकसान झाले. शुक्रवारी दुपारी तीनच्या दरम्यान झालेल्या या घटनेनंतर परिससतील सुमारे १०० हून अधिक इमारतींचा गॅस पुरवठा खंडीत झाला. महानगर गॅस (एमजीएल) च्या टीमने तात्काळ घटनास्थळी पोहचून पाईपलाईनचे काम हाती घेतले. दुरुस्ती कामासाठी सुमारे तीन तास गॅस पुरवठा बंद ठेवावा लागला. तीन तासांनी दुरुस्ती पूर्ण झाली तरी प्रत्यक्षात गॅस पुरवठा सुरू होण्यास आणखी काही तास लागले.
यामुळे दहिसरमधील छत्रपती शिवाजी महाराज लिंक रोड, सीएएमटी रोड क्रमांक ३ आणि ५, आनंद नगर, शक्तीनगर, अवधूत नगर या भागातील १०० हून अधिक गृहनिर्माण सोसायटीतील इमारतींचा गॅस पुरवठ्यावर परिणाम झाला.

error: Content is protected !!