ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
महाराष्ट्रराजकीय

सावरकरांच्या नावाला आयोजकांचा विरोध- साहित्य संमेलन वादाच्या भोवऱ्यात


नाशिक/ ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिक येथे पुढील महिन्यात होत असून संमेलन स्थळाला सावरकरांचे नाव देण्यास आयोजकांनी विरोध केल्यामुळे सावरकर प्रेमी संतप्त झाले असून त्यांनी नाशिक मध्ये ठिकठिकाणी निषेधाचे फलक लावले आहेत शिवाय त्यांच्या या तीव्र विरोधामुळे साहित्य संमेलनाच्या दिवशी गोंधळ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे हे संमेलन वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत
पुढील महिन्याच्या ३,४, आणि ५ तारखेला नाशिकच्या आडगाव मधील भुजबळ नॉलेज सिटी मध्ये ९४ व्ह अखिल भारतीय साहित्य संमेलन होणार आहे .आणि जेष्ठ खगोल शास्त्रज्ञ जयंत नारळीकर या संमेलनाचे अध्यक्ष आहेत तर नाशिकचे पालक मंत्री भुजबळ स्वागताध्यक्ष आहेत .दरम्यान सम्मेलन स्थळाला सावरकरांचे नाव देण्यात यावे अशी मागणी सावरकर प्रेमींनी केली होती कारण सावरकर स्वतः साहित्यिक होते माझी जन्मठेप,काळे पाणी ही त्यांची पुस्तके गाजली होती शिवाय मुंबईत भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पद सुधा त्यांनी भूषविले होते आणि आता त्यांच्या जिल्ह्यात म्हणजे नाशिक मध्ये साहित्य संमेलन होत असताना सम्मेलन स्थळाला त्यांचे नाव दिले जात नाही प्रवेशद्वाराला त्यांचे नाव दिले जात नाही स्वागतपर गीतातून त्यांचे नाव वगळले जाते हा अन्याय आहे असे सावरकर प्रेमिंचे म्हणणे आहे मात्र आयोजक त्यांचे एकायला तयार नसल्याने संमेलनाच्या दिवशी राडा होण्याची शक्यता आहे

error: Content is protected !!