ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
मुंबईराजकीय

राज ठाकरे यांचा हिंदू राष्ट्र अजेंडाकडे वाटचाल

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, माँ कांचनगिरीजी आणि जगतगुरू सूर्याचार्य यांची आज कृष्णकुंजवर भेट झाली. भेटीवेळी राज ठाकरे यांना अयोध्या दौऱ्याचं निमंत्रण देण्यात आलं आणि राज ठाकरे यांनीही ते स्वीकारलं आहे. राज ठाकरे डिसेंबर मध्ये अयोध्येचा दौरा करणार असल्याची माहिती मिळतेय. आपल्या पक्षाचा झेंडा बदलल्यानंतर मागील दोन वर्षापासून राज ठाकरे हिंदुत्वाच्या मुद्द्याकडे वळले आहेत. त्यानंतर नववर्षाच्या तोंडावर अयोध्या दौरा घोषित करुन राज ठाकरे यांनी हिंदू राष्ट्राचा अजेंडा हाती घेतल्याचं पाहायला मिळत आहे

error: Content is protected !!