ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामुंबई

हॉटेल दुकांच्या वेळा वाढवणार अम्युजमेंट पार्क सुधा सुरू -यंदा व्यापाऱ्यांची दिवाळी गोड

मुंबई/ करेना प्रादुर्भाव हळू हळू कमी होत असल्याने सरकारने दिवाळी पूर्वी काही निर्बंध शिथिल करायला सुरुवात केली असून काल टास्क फोर्स बरोबर झालेल्या बैठकीनंतर हॉटेल्स आणि दुकानांच्या वेळा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला त्यामुळे यंदा व्यापाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे .
गेल्या वर्षी कोरोना आणि लॉक डाऊन मुले दुकाने बंद असल्याने व्यापार उद्योगाचे प्रचंड नुकसान झाले होते मात्र या वर्षी करोना आटोक्यात येत असल्याने अनलॉक प्रक्रिये अंतर्गत व्यापार उद्योग आणि इतर सर्व आस्थापना सह मंदिरे आणि शाळा कॉलेज सुधा सुरू झालीत त्यामुळे निदान यंदा तरी आमची दिवाळी गोड करा अशी विनंती सर्वच क्षेत्रातील लोकांनी केली होती .त्यानुसार काल शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी टास्क फॉरस डॉक्टरांची चर्चा करून दुकानांच्या वेळा वाढवून देण्याचा निर्णय घेतला त्यामुळे आता दुकाने हॉटेल्स रात्री १० नंतरही सुरू राहतील तसेच २२तारखेपासून नाट्य आणि सिनेमागृह सुधा सुरू होतील २२तारखेपासून अंत्पा अम्युजमेंट पार्क सुद्धा सुरू होतील त्यामुळे यंदा व्यापारी आणि सर्व सामन्यांची दिवाळी गोड होणार आहे दिवाळी नंतर प्रार्थमिक शाळाही सुरू होणार आहेत,

error: Content is protected !!