ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
महापालिकामुंबई

मुंबईच्या जुन्या पुलांची पालिकेकडून पुनर्बांधणी होणार ,पण तिथल्या लोकांच्या पुनर्वसनाचे काय ?


मुंबई ( किसनराव जाधव ) पालिका निवडणूक जस जशी जवळ येत चालली आहे तसतशी नको नाकोती अनावश्यक कामे हाती घेऊन मुंबईकरांच्या पैशावर डल्ला कसा मारता येईल याचे पालिकेतील सत्ताधाऱ्यांकडून मनसुबे आखले जात आहे. पेगविंच्या देखभालीची वाढीव खर्चाची तजवीज करण्याचा १५ कोटींचा प्लॅन फसल्यानंतर आता जवळपास १७०० कोटींच्या जुन्या पुलांच्या पुनर्बांधणीचा घाट घातला जात आहे. कोविड निरमूलनवर पालिकेचा अफाट पैसा खर्च होत असताना हजारो कोटींची नवी कामे का ? आणि कोणाच्या फायद्यासाठी हाती घेतली जात आहेत ? असा सवाल मुंबईकर जनता करीत आहे.
मुंबईमध्ये जवळपास १०० ते १२७ वर्षांचे १२ जुनाट पुल आहेत आणि त्यांची पुनर बांधणी करायची झाल्यास प्रत्येक पुलासाठी सरासरी १२५ ते २०० कोटींचा खर्च आहे .एका पुलाचा तर ३75 कोटी खर्च आहे आणि पालिका हा खर्च करणार आहे .मात्र या सर्व पुलांच्या आजूबाजूला तसेच पुलाखाली मोठ्या प्रमाणावर लोकांची घरे आहेत पुलाचे काम करताना या सर्व लोकांना तेथून हटवावे लागणार त्यांचे योग्य ठिकाणी पुनर्वसन करावे लागणार मात्र हे वाटते तितके सोपे नाही.यात मोठा खर्च तर आहेच पण पुनर्वसनाची ही प्रक्रिया राबवताना अनेक संकटाना तोंड द्यावे लागणार आहे कोरोंना संकट काळात पालिका प्रशासनाचे संपूर्ण लक्ष कोरोंना निर्मूलनाच्या मोहीम रबंविनयाकडे असे असताना आणखी मोठे प्रकल्प हाती घेणे आणि त्यावर अवाढव्य खर्च करणे कितपत योग्य आहे .पालिका प्रशासन आणि सत्ताधारी शिवसेनेने याचे उत्तर द्यावे आणि जुन्या पुलांच्या पूनर बांधणीचा हा प्रकल्प कोरोंना संपल्यावर हाती घ्यावा अशी मुंबईकर जनतेची मागणी आहे.तसे पाहता हे १२ पुल ब्रिटिशांच्या काळातील असल्याने त्यांचे बांधकाम १०० वर्षानंतरही मजबूत असल्याने ते काही ताबडतोब कोसळणार नाहीत .मुंबईत शेकडो धोकादायक इमारती आहेत आणि दर पावसाळ्यात त्यात कुठली ना कुठली इमारत कोसळून मोठी जीवितहानी होती पालिकेला जर लोकांची इतकी काळजी आहे तर या जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारती चां पूनरविकास हाती घ्यावा ,नको तिथे केवळ टक्केवारी साठी मुंबईकरांच्या पैशाची उधळपट्टी करू नये असं मुंबईकर जनता म्हणत आहे

सदर ब्रिज बांधकामाचा खर्च बीएमसी उचलणार आहे. महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि रेल्वेद्वारे बांधले जाणार आहेत.

  • वांद्रे-वरळी सी लिंकवर आकर्षक आणि लेझर लाईटचा प्रकाश असणार आहे.
  • पूल रुंद आणि वाहतुकीची समस्या नसेल.
  • बांधकाम सुरू असतानाही वाहतूक सुरळीत राहील.
    केबल-स्टे पद्धतीद्वारे पूल मजबूत
    करन्यात येईल
  • अंदाजे येणारा खर्च ?
  • रे रोड ब्रिज – १७५ कोटी रुपये
  • टिळक ब्रिज दादर – ३७५ कोटी
  • भायखळा पूल – २०० कोटी
  • घाटकोपर पूल – २०० कोटी
  • बेलासिस ब्रिज मुंबई सेंट्रल – १५० कोटी
  • आर्थर रोड ब्रिज – २५० कोटी
  • सेंट मेरीजगाव पुल – ७५ कोटी
  • करी रोड ब्रिज – ५० कोटी
  • मंटुगा ब्रिज – ५० कोटी
  • ऐस ब्रिज भायखळा – ५० कोटी
  • लोअर परळ पूल – १०० कोटी
  • महालक्ष्मी पूल – १०० कोटी रुपये
सर्व पुलांच्या आजूबाजूला तसेच पुलाखाली मोठ्या प्रमाणावर लोकांची घरे ,बँक,व्यवसायीक शेड आहेत या पुलाचे काम करताना या सर्व लोकांना तेथून कुठे हलवणार याचा प्लॅन पालीके
कडे आहे का
?

error: Content is protected !!