ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय

शिवसेना भाजपामध्ये राडेबाजीला सुरूवात

मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली मारण्याची भाषा भोवली नारायण राणे यांना अटक

मुंबई/ जन आशीर्वाद यात्रेसाठी महाराष्ट्राच्या दोन्यावर आलेले केंद्रीय सुष्म व लघु उद्योग मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांच्या कानाखाली मारण्याची भाषा करताच संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसेना पेटून उठली . त्यानंतर राणेंच्या प्रापटीवर हल्ले सुरू झाले .बंगला, मॉल,पेट्रोल पंप यांना शिवसैनिकांनी टार्गेट केले दरम्यान राणेंवर गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक होताच .सेना भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये राडेबाजीला सुरुवात झाली. .या राडेबाजी मुळे संपूर्ण महाराष्ट्रात तणाव असून राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने दाखल करून घेण्यास नकार दिल्याने . त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत .
राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे काल सकाळपासूनच शिवसैनिक रस्त्यावर उतरले आणि त्यांनी राणेंच्या जुहू येथील बंगल्याकडे मोर्चा वळवला . मात्र तिथे राणेंचे कार्यकर्ते सुधा हजार होते .त्यामुळे घोषणाबाजी आणि हटापायी सुरू होताच पोलिसांनी सौम्य लाठीमार करून दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांना पांगवले .मात्र शिवसेना ठीक ठिकाणी भाजपच्या कार्यालयांना टार्गेट करीत होते.याच दरम्यान राणेंचा पुण्यातील मॉल शिवसैनिकांनी फोडला तर नाशिक आणि अन्य दोन ठिकाणी राणेंच्या विरोधात गुन्हा दखल करण्यात आला -यावेळी संपूर्ण महाराष्ट्रातले शिवसैनिक आक्रमक होऊन राणेंचे पुतळे जाळत होते . मिळेल त्या भाजपा कार्यकर्त्याला फटकावत होते याच दरम्यान दुपारी चिपळूण मध्ये राणेंची जनआशीर्वाद येताच तिथे शिवसेना भाजपा कार्यकर्ते आमनेसामने आले आणि दोन्हीकडून दगडफेक सुरू झाली . मात्र पोलिसांनी सौम्य लाठीमार करून कार्यकर्त्यांना पांगवले.याच दरम्यान नाशिक पोलीस राणेंना अटक करण्यासाठी कोकणाकडे निघाले तसे राणेंचे वकील अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न करू लागले . मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली पण ओरिजनल कागदपत्रे आणा असे सांगून न्यायालयाने याचिका दखल करून घेण्यास नकार दिला .त्यानंतर दुसऱ्यांदा याचिका दखल करण्यात आली यावेळी उद्या याचिका दखल करा असे हायकोर्टाने सांगितले . त्यामुळे राणेंना संगमेश्वर पोलीस ठाण्यात नेऊन त्यांच्यावर रीतसर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली .तेथून नंतर त्यांना महाडच्या दंडाधिकारी समोर हजर करण्यात आले हे सर्व होत असताना शिवसेना आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये ठिकठिकाणी राडेबाजी सुरू होती . काही दिवस हा तणाव असाच कायम राहील असे दिसते .
दरम्यान महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षांच्या नेत्यांनी नारायण राणे यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध करून त्यांना झालेल्या अटकेचे समर्थन केले आहे .


बॉक्स/राणेंना मत्रिमंडळातून हकलन्यासाठी शिवसेनेचे पंनतप्रधान पत्र .
एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली मारण्याची भाषा करणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करावी अशी मागणी शिवसेनेने केली असून याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहला असल्याचे शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी सांगितले आता मोदी याबाबत काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

error: Content is protected !!