ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

दिशा सालियांन प्रकरण- राणे पिता पुत्रंच्या अंगाशी अटकेच्या भीतीने उच्च न्यायालयात धाव

मुंबई दिशा सलीयांन हिच्यावर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचे विधान करणे राणे पिता पुत्रांना चांगलेच महागात पडले असून या प्रकरणात गुन्हा दखल होऊन अटकेची शक्यता असल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे.
१९ फेब्रुवारी रोजी नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांच्यासोबत नितेश राणे सुधा होते. या पत्रकार परिषदेत त्यांनी दिशाच्या मृत्यू बाबत बोलताना, दिशावर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली, असा गंभीर आरोप केला होता . त्यामुळे दिशाच्या पालकांनी या प्रकरणी राज्य महिला आयोगाकड तक्रार केली होती .त्यानंतर महिला आयोगाने या प्रकरणी पोलिसांना चौकशीचे आदेश देऊन दोन दिवसात अहवाल द्यायला सांगितले होते. . पण पोलिसांनी दिशाच्या शवविच्छेदनाच्या अहवालाच्या आधारे महिला आयोगाला सदर केलेल्या अहवालात, दिशावर कोणत्याही प्रकारचे लैंगिक अत्याचार झाले नव्हते, तसेच तिची हत्याही झालेली नाही असे स्पस्ट केले होते. त्यामुळे चुकीची माहिती पसरवून दिशाची बदनामी केल्याबद्दल, राणे पितापुत्रंवर मालवणी पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला होता . या गुन्ह्याच्या तपासांतर्गत, राणे पिता पुत्रांची तब्बल ९ तास मालवणी पोलीस ठाण्यात चौकशी झाली होती . मात्र दिंडोशी सत्र न्यायालयाने त्यांना १० मार्च पर्यंत अटक करू नये असे आदेश दिले होते . आता हा गुन्हाच रद्द करण्यासाठी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. यात आमच्याविरुद्ध राजकीय शत्रुत्व ठेवून आमच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याद्वारे आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याने ,हा गुन्हा रद्द करण्यात यावा अशी त्यांनी न्यायालयाकडे मागणी केली आहे. तर दुसरीकडे त्यांना अटकपूर्व जमीन मिळू नये यासाठी पोलीस प्रयत्न करीत आहेत. मात्र हे प्रकरण राणे पिता पुत्रांना आता चांगलेच महागात पडणार आहे.

.

error: Content is protected !!