ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

शिंदे गटाचे मुंबईतील उमेदवार जाहीर – दक्षिण- मुंबईतून यामिनी जाधव तर उत्तर – पश्चिममधून रवींद्र वायकर उत्तर मुंबईतून कॉंग्रेसचे भूषण पाटील


मुंबई – दक्षिण मुंबई आणि उत्तर -पश्चिम मुंबईतून शिंदे गटाचे उमेदवार कोण याबाबत सर्वाना मोठी उत्सुकता होती अखेर आज या दोन्ही ठिकाणचे उमेदवार जाहीर करण्यात आले. दक्षिण मुंबईतून शिंदे गटाच्या भायखळ्याच्या आमदार यामिनी जाधव यांना उमेदवारी देण्यात आली . त्यामुळे या मतदार संघासाठी देव पाण्यात बुडवून असलेले भाजपचे राहुल नार्वेकर यांचा पत्ता कट झाला. आता शिंदे गटाच्या यामिनी जाधव विरुद्ध ठाकरे गटाचे विद्यमान खासदार अरविंद सावंत यांच्यात सरळ लढत होणार आहे. तर उत्तर पश्चिम मधून आज शिंदे गटाने जोगेश्वरीचे आमदार रवींद्र वायकर यांच्या नावाची घोषण केली . त्यामुळे त्या मतदार संघात २ शिव्सैनिकांमध्ये लढत होईल या मतदार संघातून ठाकरे गटाचे अमोल किर्तीकर विरुद्ध शिंदे गटाचे रवींद्र वायकर या दोन शिवसेना आमदारांमध्ये लढत होईल. दरम्यान आज कॉंग्रेसने उत्तर मुंबईतील आपल्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केली . तिथे भाजपच्या पियुष गोयल यांच्या विरुद्ध कॉंग्रेसने भूषण पाटील यांना मैदानात उतरवले आहे.

error: Content is protected !!