ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामुंबई

महापालिका निवडणुकीच्या हालचाली सुरू

मुंबई – महापालिका निवडणुकीच्या हालचालींना आता वेग आला असून वार्ड पुनर्रचना आराखडा निवडणूक आयोगाला सादर करण्यात आला आहे .मुंबईसह १८ महानगर पालिकांच्या निवडणुका आता जवळ आल्या आहेत निवडणूक आयोग कधीही या निवडणुकांची घोषणा करू शकतो त्यामुळे सर्वच पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत
मुंबईत वार्ड संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे नवीन वार्ड रचनेचा आराखडा तयार करून ,तो राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आला आहे. आता मुंबईची वार्ड संख्या २२७ वरून २३६ इतकी झाली आहे. आज निवडणूक आयोगाकडे मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने वार्ड पुनर्रचनेचा आराखडा सदर करण्यात आला आहे. २०११ च्या लोकसंख्येच्या आधारे नव्या इमारती, वस्त्या, वाढीव बांधकामे झालेल्या परिसराचा विचार कार्ताकार्तापुनार्राच्नेचा विचार करण्यात आला आहे. मुंबई शहर,उपनगर आणि आणि पूर्व उपनगरात प्रत्येकी तीन वार्ड वाढवण्यात आल्याची माहिती समजते शहरातील वरळी, लोअर परेल ,पूर्व उपनगरात मानखुर्द,संघर्ष्नगर,माहूल तर पश्चिम उपनगरात बोरीवली, मालाड, वांद्रे या भागात वार्ड वाढवले जाऊ शकतात
कोरोनामुळेमुदत संपलेल्या महापालिकांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत मुंबई महापालिकेचा कालावधी फेब्रुवारी २०२२ मध्ये संपत असल्याने आता काही दिवसच शिल्लक आहेत मुंबई महापालिकेच्या निवडणुका वेळेवर व्हाव्यात यासाठी प्रयत्न सुरु आहेत परंतु जर ओमिक्रोन मुळे रुग्ण संखेत भर पडत गेली तर मुंबईसह इतर महापालिका निवडणुकाही लांबणीवर पडतील सध्या मुंबई महापालिकेत शिवसेनेची एकहाती सत्ता आहे. भाजपने शिवसेनेच्या सतेला सुरुंग लावण्यासाठी कंबर कसलेली आहे. सेनेने मागील निवडणुकीत ९१ जागा जिंकल्या होत्यातर भाजपला ८३ जागा मिळाल्या होत्या मनसेचे सात नगरसेवक निवडून आले होते परंतु काही वर्षांपूर्वी मनसेच्या ६ नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे शिवसेनेचे संख्याबळ ९७ झाले आहे. यंदाच्या निवडणुकीत ९ नगरसेवकाची भर पडणार आहे. मुंबई महापालिका क्षेत्रात ३.८७ एवढी लोकसंख्या वाढ १००१ ते २०११ या काळात झाली होती आता या वाढलेल्या वार्डांचा कोणाला फायदा होतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

error: Content is protected !!