ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

गोवर्धन चां प्रकाशन सोहळा – ना इंजेक्शन ..ना गोली .. दो अंगुठे की कमाल ..


मुंबई / धन्वंतरी विद्येने हजारो रुग्णांना व्याधिमुक्त करणारे  विख्यात धन्वंतरी डॉ. गोवर्धनलाल पराशर यांच्या गोवर्धन या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा 9 मार्च रोजी मुंबई मराठी पत्रकार संघात पार पडला.या वेळी माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते गोवर्धन पराशर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे हजर होते यावेळी मराठी बाणा फेम अशोक हांडे, कारगिल युद्ध योद्धा संदेश सिंगल कर , खासदार बाळासाहेब धानोरकर , खासदार अरविंद सावंत ,माजी मंत्री विलास मुत्तेमवार , वाहतूक आयुक्त अविनाश ढाकणे ,संपादक अतुल कुलकर्णी, पत्रकार राही भिडे, मुंबई मराठी पत्रकार संघ अध्यक्ष नरेंद्र वाबळे , वरिष्ठ पो.निरीक्षक शबाना शेख आदी मान्यवर हजर होते .कार्यक्रमाचे नियोजन पत्रकार मधुकर भावे,अशोक मुंशी यांनी केले

error: Content is protected !!